नामांतर पूर्ण! औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांबाबत आदेश निघाला
Aurangabad | Osmanabad : मुंबई : राज्यातील औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन्ही शहारांच्या नामांतरापाठोपाठ आता या दोन्ही जिल्हा आणि तालुक्याचंही नाव बदलण्यात आलं आहे. सोमवारी (२७ फेब्रुवारी) रात्री उशीरा महसूल, वन आणि नगरविकास विभागाने याबाबतची अधिसुचना जारी केली. यानुसार आता विभाग, उपविभाग, जिल्हे, शहर, तालुका, गाव, महापालिका, नगरपालिका अशा सर्व पातळ्यांवर नामांतर प्रक्रिया पूर्ण […]
ADVERTISEMENT
Aurangabad | Osmanabad :
ADVERTISEMENT
मुंबई : राज्यातील औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन्ही शहारांच्या नामांतरापाठोपाठ आता या दोन्ही जिल्हा आणि तालुक्याचंही नाव बदलण्यात आलं आहे. सोमवारी (२७ फेब्रुवारी) रात्री उशीरा महसूल, वन आणि नगरविकास विभागाने याबाबतची अधिसुचना जारी केली. यानुसार आता विभाग, उपविभाग, जिल्हे, शहर, तालुका, गाव, महापालिका, नगरपालिका अशा सर्व पातळ्यांवर नामांतर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (After the name change of Aurangabad and Osmanabad cities in the state, now the name of both the district and taluka has also been changed)
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सांगितले तेच ‘करुन दाखविले’…
छत्रपती संभाजीनगर, धाराशिवच्या बाबतीत महसूल-वन विभाग आणि नगरविकास विभाग यांच्याही अधिसूचना जारी…
आता विभाग, उपविभाग, जिल्हे, शहर, तालुका, गाव, महापालिका, नगरपालिका अशा सर्व पातळ्यांवर नामांतर ! pic.twitter.com/LCmB47WmyC— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 27, 2023
हे वाचलं का?
केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही!’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
जिल्ह्याच्या नामांतर प्रक्रियेवरुन मोठा वाद झाला होता… :
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही अधिसुचना काढून या शहरांच्या नामांतराला मंजूरी दिली होती. मात्र जिल्हा आणि तालुक्याचं नाव बदलण्यात आलं नव्हतं. यावरुन विरोधकांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. यावर आम्ही अर्धवट काहीच ठेवतं नसल्याचं सांगतं फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिलं होतं.
ADVERTISEMENT
Aurangabad: ‘आम्ही अर्धवट काहीच ठेवत नाही’, देवेंद्र फडणवीसांनी मारला टोमणा
ADVERTISEMENT
शिंदे-फडणवीस सरकारने नामांतराचा फेरप्रस्ताव केलेला सादर
औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरांबाबत ठाकरे सरकारने घाईने निर्णय घेतले होते. 29 जूनला राज्यपालांनी बहुमत चाचणी घ्यायला सांगितलेली असताना आणि सरकार अल्पमतात असताना हे निर्णय घेतले गेले. त्यावर काही कायदेशीर बाबी निर्माण होऊ नयेत म्हणून फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश आम्ही देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 जुलै 2022 रोजी सांगितलं होतं.
त्यावेळी एकनाथ शिंदे असं म्हणालेले की, ‘नामांतराबाबतच्या फेरप्रस्तावांना रितसर बहुमत असलेल्या सरकारने मान्यता दिली. त्यानुसार औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव, उस्माबादला धाराशिव हे नाव तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.’ असं एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT