‘त्या’ प्रकरणावर अजित पवारांनी सोडलं मौन; म्हणाले, “मी आणि छगन भुजबळ…”
राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत, तरीही माध्यमांनी पवार-भुजबळांचा कलगीतुरा असल्याची चुकीची बातमी छापल्याची टीका त्यांनी केली.
ADVERTISEMENT
Ajit Pawar : राज्याच्या विरोधी पक्षनेते पदावर अजित पवार असताना कालांतराने त्यांनी राजीनामा देऊन ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party) पवार विरुद्ध पवार असा वाद रंगला असतानाच अजित पवारांनी मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) आणि आपल्यातील वादावर माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्ताविषयी खुलेपणाने सांगितले. (ajit pawar chhagan bhujbal is not dispute, news was misprinted)
ADVERTISEMENT
खासगी शाळांचे पेव फुटले
अजित पवारांनी यावेळी मराठी शाळा आणि खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांविषयी बोलताना त्यांनी मराठी माध्यमांच्या शिक्षकांवरही टीका केली. अजित पवारांनी सांगितले की, 1972 पासून एकाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सरकारकडून परवानगी देण्यात आली नाही. तरीही त्या इंग्रजी शाळांचे अनेक भागात पेव फुटले आहे. त्यामुळे पटसंख्या कमी करण्यावरुन किंवा इतर कोणत्याही गोष्टीवरुन शिक्षकांनी ओरड करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> NCP President : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “काळजी करण्याची…”
‘तो’ प्रयत्न करणार
आज खासगी अकॅडमीत दोन दोन लाख रुपये फी भरायला कुणीही मागे पुढे पाहत नाहीत. मात्र 35 च्या आता पटसंख्या आणली की लगेच आमच्या अन्याय होतो अशी टीका केली जाते. समाजातील जो घटक वंचित आहे, जो दुर्लक्षला गेला आहे त्यांना इतरांबरोबर आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी आम्हीही प्रयत्न करणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
हे वाचलं का?
पवार-भुजबळांचा कलगीतुरा
अजित पवारांनी छगन भुजबळ आणि आपल्या वादावर बोलताना सांगितले की, आम्ही दोघं एका मु्द्यावर चर्चा करत होतो. त्यावेळी माध्यमांनी बातमी छापली की, अजितदादा आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये कलगीतुरा म्हणत बातम्या छापून आल्या. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत त्यांनी प्रत्येकाला इथे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
हे ही वाचा >> JNU Controversy : ‘भगवा जलेगा… फ्री कश्मीर…; JNU मधील भिंतीवर वादग्रस्त घोषणा
आपण लोकशाहीत
अजित पवार म्हणाले की, आपण लोकशाहीत आहे. कोणताही मुद्दा मांडण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे त्यावेळी छगन भुजबळांनी मत मांडले त्याबाबत कोणताही तर्क काढण्याची गरज नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अजित पवार पुणे विभागातील शिक्षक मतदार संघाच्या माध्यमातून बारामती व दौंड येथील शाळांना शालेय साहित्य व संगणक प्रिंटर या वस्तू समारंभाच्या वितरणावेळी त्यांनी या गोष्टीवर पडदा टाकला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT