Ajit Pawar: अजितदादा म्हणाले मला पक्षात पद द्या, शरद पवारांनी थेट…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar has demanded a post in the NCP party in a public event. However, Sharad Pawar did not even mention this demand in his speech.
Ajit Pawar has demanded a post in the NCP party in a public event. However, Sharad Pawar did not even mention this demand in his speech.
social share
google news

Politics in Maharashtra: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज (21 जून) मुंबईत पार पडला. ज्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टपणे सांगितलं की, त्यांना विरोधी पक्ष नेते पदातून मुक्त करा आणि पक्षात पद द्या.. आपली ही मागणी अजित पवारांनी अगदी जाहीरपणे आणि ते देखील शरद पवारांच्या (Sharad Pawar) समोर सांगितली. पण अजित पवारांच्या या मागणीवर शरद पवार काय बोलणार किंवा त्याबाबत काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. (ajit pawar demand ncp position sharad pawar anniversary of ncp politics)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्यापासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशातच आता अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पद नको पण पक्षात पद द्या अशी थेट मागणी केली.

शरद पवारांनी अजितदादांच्या ‘त्या’ मागणीचा उल्लेख केला नाही!

अजित पवार यांनी त्यांच्या मनातील भावना जाहीरपणे बोलून दाखविल्यानंतर शरद पवार हे त्यावर काय बोलणार याकडे अवघ्या राष्ट्रवादी काँग्रेसचं लागून राहिलं होतं. मात्र, आपल्या संपूर्ण भाषणात शरद पवार यांनी अजित पवारांच्या मागणीविषयी ब्र देखील काढला नाही. त्यामुळे शरद पवारांनी अनुल्लेखानेच अजित पवारांना दूर सारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘मला विरोधी पक्ष नेतेपद नको, फक्त…’, शरद पवारांसमोरच अजितदादांनी टाकला नवा बॉम्ब

शरद पवार हे आपल्या राजकीय टायमिंगसाठी ओळखले जातात. एखादा निर्णय घेताना ते अचूक टायमिंग साधतात. असं असताना आज त्यांनी अजित पवारांच्या मागणीविषयी काहीही न बोलणं यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, आता अजित पवारांनी जाहीरपणे मागणी करून देखील जर त्यांना पक्षात कोणतं पद देण्यात आलं नाही तर त्याचे पडसाद कसे उमटतील आणि अजित पवार नेमका कोणता निर्णय घेतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

अजित पवारांनी नेमकी मागणी केली तरी काय?

‘1 वर्ष मी विरोधी पक्षनेते पद सांभाळलं आहे. ते सांभाळत असताना काहीचं म्हणणं आहे की, तू कडक वागत नाही.. आता म्हटलं की… आता त्यांची गचांडी धरू की काय करू? म्हणजे काय आता कळत नाही..’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘दादांनी माझे महिने मोजलेत..’, जयंत पाटलांनी ‘असा’ काढला अजितदादांना चिमटा!

‘पण म्हटलं आता बस झालं.. मला त्यातून आता मुक्त करा.. आणि संघटनेची जबाबदारी द्या.. आणि मग कशा पद्धतीने पक्ष चालतो… अर्थात हा अधिकार नेते मंडळींचा आहे. पण माझी इच्छा आहे.. बाकीचे वेगवेगळे इच्छा प्रदर्शित करतात. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडली आहे. त्यामुळे थोडं संघटनेत कुठलंही पद द्या. काय कसलंही पद द्या.. तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला न्यायच दाखवून देईल. एवढा शब्द देतो मी..’ असं जाहीर मागणी अजित पवार यांनी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT