Amit Shah : ''शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे सुत्रधार'', अमित शाहांची बोचरी टीका
Amit Shah News : ''शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सूत्रधार आहेत. त्यांनी आपल्या देशात भ्रष्टाचाराचे संस्थानिकीकरण केले आहे'', अशी जोरदार टीका अमित शाहा यांनी शरद पवारांवर केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले?
शरद पवारांनी महाराष्ट्राला खोटी आश्वासने दिली.
महाविकास आघाडी हा औरंगजेबचा फॅन क्लब आहे.
Amit Shah Criticize Sharad Pawar : ''शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सूत्रधार आहेत. त्यांनी देशात भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्या'', अशी जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांनी शरद पवारांवर केली आहे.तसेच ''मला शरद पवारांना (Sharad Pawar) विचारायचंय, 10 वर्ष तुमचं सरकार होतं, तुम्ही 10 वर्षात महाराष्ट्राला काय दिलं'', असा खडा सवाल देखील शाहांनी शरद पवारांना केला आहे. (amit shah criticize sharad pawar on maratha reservation curruption pune bjp adhiveshan maharashtra politics)
पुण्यात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अमित शाहा बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. '' जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे. पण जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार आले, तेव्हा मराठा आरक्षण गायब झाले आहे'', अशी टीका शाहांनी पवारांवर केली. तसेच शरद पवारांचे सरकार आलं तर मराठा आरक्षण जाईल. मराठा आरक्षण कायम ठेवायचं असेल तर भाजप सरकार आलंच पाहिजे, असे विधान करून अमित शाहा यांनी मराठा समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा : Devendra Fadnavis : ''लाडक्या बहिणींचे फॉर्मच सबमीट करणार नाहीत...'', फडणवीस 'हे' काय बोलून गेले?
'''मी शरद पवारांना विचारतो की त्यांनी महाराष्ट्राला काय दिले? त्यांनी केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. त्यांच्या सरकारने 1 लाख 19 हजार कोटी दिले, तर गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला 10 लाख कोटी दिले. मी या 10 लाख कोटींमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा समावेश केलेला नाही'', असा हल्ला देखील शरद पवारांनी पवारांवर चढवला.
''ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते''
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने ज्या प्रकारे अपमान केला होता, तसा इंग्रजांनीही देखील केला नव्हता. आम्ही डॉ. आंबेडकरांसाठी पाच प्रार्थनास्थळे विकसित केली आहेत ज्याचा काँग्रेसने विचारही केला नव्हता, अशी टीका अमित शाहा यांनी काँग्रेसवर केली.










