Amit Shah : ''बाळासाहेबांचा वारसा सांगणारे ठाकरे औरंगजेबाचे...'', पुण्यातून शाहा कडाडले!
Amit Shah News : पुण्यातल्या भाजपच्या मेळाव्यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाविकास आघाडी हा औरंगजेबचा फॅन क्लब आहे.
बाळासाहेबांचा वारस सांगणारे उद्धवजी...
भाजपच न्याय देऊ शकतो
Amit Shah On Uddhav Thackeray : पुण्यातल्या भाजपच्या मेळाव्यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. बाळासाहेबांचा वारस सांगणारे उद्धव ठाकरे हे औरंगजेबच्या फॅन क्लबचे नेते असल्याची टीका अमित शाहा यांनी केली आहे. (amit shaha criticize udhhav thackeray aurangjeb fanclub sharad pawar maharashtra politics)
महाविकास आघाडी (MVA) हा औरंगजेबचा फॅन क्लब आहे. उद्धव ठाकरे हे या फॅन क्लबचे नेते आहेत. बाळासाहेबांचा वारसा सांगणारे उद्धवजी, कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत. याकूबला सोडण्याची विनवणी करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही बसला आहात. झाकीर नाईकला मेसेंजर ऑफ पीस बनवणाऱ्या लोकांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात. ते आपल्या लोकांना न्याय देतील असे वाटते का? भाजपच न्याय देऊ शकतो, असे म्हणत अमित शाहांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Devendra Fadnavis : ''लाडक्या बहिणींचे फॉर्मच सबमीट करणार नाहीत...'', फडणवीस 'हे' काय बोलून गेले?
शाहांचा शरद पवारांवर जोरदार हल्ला
''शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सूत्रधार आहेत. त्यांनी देशात भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्या'', अशी जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी शरद पवारांवर केली आहे.'' जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे. पण जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार आले, तेव्हा मराठा आरक्षण गायब झाले आहे'', अशी टीका शाहांनी पवारांवर केली. तसेच शरद पवारांचे सरकार आलं तर मराठा आरक्षण जाईल. मराठा आरक्षण कायम ठेवायचं असेल तर भाजप सरकार आलंच पाहिजे, असे विधान करून अमित शाहा यांनी मराठा समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला.
'''मी शरद पवारांना विचारतो की त्यांनी महाराष्ट्राला काय दिले? त्यांनी केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. त्यांच्या सरकारने 1 लाख 19 हजार कोटी दिले, तर गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला 10 लाख कोटी दिले. मी या 10 लाख कोटींमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा समावेश केलेला नाही'', असा हल्ला देखील शरद पवारांनी पवारांवर चढवला.
हे ही वाचा : Devendra Fadnavis : "शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, मग...", फडणवीसांनी घेरलं
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT