Amruta Fadnavis: ‘मुस्लिम गरबा पाहायला आले तर काही चूक नाही…’, अमृता फडणवीसांचं थेट विधान!

मुंबई तक

गरबा वादावर अमृता फडणवीसांनी वेगळी भूमिका मांडली आहे. मुस्लिम व्यक्ती शांततेत उत्सवाचा आनंद घेत असेल तर त्यात गैर नसल्याचे वक्तव्य अमृता फडणवीसांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

चंद्रपूर: नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावरून महाराष्ट्रात सुरू असलेल्या वादाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे नवे वळण मिळाले आहे. चंद्रपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी गरबा हा सर्वसमावेशक उत्सव असल्याचे सांगत, मुस्लिम व्यक्ती शांततेत कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी येत असेल तर त्यात गैर काहीही नसल्याचे मत व्यक्त केले. त्यांची ही भूमिका भाजप नेते नितेश राणे यांच्या यापूर्वीच्या वक्तव्यापेक्षा वेगळी असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

नेमका वाद काय आहे?

काही हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्रातील नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली होती. भाजप नेते नितेश राणे यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या?