नराधम बापाने आधी मुलीवर अन् नंतर 14 वर्षाच्या मुलावर केला अत्याचार

मुंबई तक

Crime News : बाप आणि मुलांच्या नात्याला काळिमा फासणारा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. बापानेच 14 वर्षीय मुलावर कथितरित्या लैंगिक अत्याचार केला. पोलिसांच्या तपासातून ही घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News (AI Photo)
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बाप आणि मुलांच्या नात्याला काळिमा

point

14 वर्षीय मुलावर कथितरित्या लैंगिक अत्याचार

point

यापूर्वी मुलीवर देखील केला होता अत्याचार

Crime News : बाप आणि मुलांच्या नात्याला काळिमा फासणारा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. बापानेच 14 वर्षीय मुलावर कथितरित्या लैंगिक अत्याचार केला. पोलिसांच्या तपासातून ही घटना समोर आली आहे. आरोपी यापूर्वी देखील आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. याच प्रकरणात तो तुरूंगात गेला होता, तो नुकताच जामिनावर तुरूंगातून सुटून बाहेर आला होता. यानंतर पुन्हा ही दुर्दैवी घटना घडली. हा प्रकार मध्य प्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यातील बहोडापुर ठाणे क्षेत्रातील आहे. 

हे ही वाचा : विद्यार्थ्याच्या बापाचे शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

14 वर्षीय मुलावर कथितरित्या लैंगिक अत्याचार

माहितीनुसार, मुलाच्या आई-वडिलांमध्ये अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू होता. ते काही वर्षांपासून एकमेकांपासून विभक्त राहू लागले होते. संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, बापाने नोकरीच्या राजीनाम्याबाबत सांगितले आणि मुलाला खोलीत नेत त्याच्यासोबत गैरवर्तन केले. एवढंच नसून जर यातील घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. आई घरी परतल्यानंतर आईला रडत रडत त्याने घडलेला घटनेचा सर्व प्रकार सांगितला. 

वडिलांविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

यानंतर आई पीडित मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात गेली. पोलिसांनी मुलाने सांगितलेल्या जबाबावर वडिलांविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आरोपी हे घटनास्थळावरून फरार आहेत. पीडितेची आई ही घरकाम करते आणि तिचा नवरा हा तिच्यापासून काही वर्षांपासून विभक्त राहतो. दोघांमध्ये कोर्टात खटला देखील सुरू आहे. 

हे ही वाचा : कराड: दोन वर्षांपासून आईसोबत मित्राचे प्रेमसंबंध, साथीदाराच्या मदतीने बॉयफ्रेंडला संपवलं

संबंधित प्रकरणात बहोडापुर पोलीस ठाणे टीआई आलोक परिहार यांच्या माहितीनुसार, आईने केलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत.