आई आणि बहिणीने खेळण्यास दिला नकार, 11 वर्षीय मुलाने गळफास घेत स्वत:ला संपवलं
Crime News : एका चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावत जीवन संपवलं. आत्महत्येमागील कारण समोर आलेलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलाने कपडे अडकवलेल्या दोरीने फास घेत संपवलं जीवन
आई जेवण करण्यासाठी मुलाला बोलावण्यास गेली अन्..
Crime News : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. मुरादाबाद येथील रामतलैया परिसरात एका चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावत जीवन संपवलं. आत्महत्येमागील कारण समोर आलेलं आहे. आत्महत्येमागील कारण समोर आलेलं आहे. नागरिकांच्या मते, मुलाने आईला आणि बहिणीला खेळण्यासाठी बोलावले होते, मात्र दोघी देखील घटनास्थळी न आल्याने मुलाने गळफास घेत जीवन संपवले.
हे ही वाचा : तरुणाचं एकतर्फी प्रेम, पोलिसाच्या बहिणीवर रागाच्या भरात केला गोळीबार
मुलाने कपडे अडकवलेल्या दोरीने फास घेत संपवलं जीवन
ही घटना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घराच्या छतावर घडली होती. घडलेल्या घटनेनुसार, मुलगा हा छतावर खेळत होता, तेव्हा त्याच्यासोबत त्याची बहीण देखील खेळत होती. मात्र, नंतर तिने घरचा अभ्यास करण्यास सुरूवात केली. अशातच मुलाने बहिणीला खेळण्यास बोलावले, मात्र तिने येण्यास नकार दिला. तर दुसरीकडे मुलाने आईला बोलावले असता, आई देखील घरकामात व्यस्त होती. त्यामुळे तिने देखील खेळायला येण्यास नकार दिला होता, त्यानंतर मुलाने कपडे अडकवलेल्या दोरीने फास घेत जीवन संपवलं.
आई जेवण करण्यासाठी मुलाला बोलावण्यास गेली अन्..
रात्री 11 वाजता आई आपल्या मुलाला जेवण करण्यासाठी बोलवायला गेली असता, समोर मुलाचा मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तेवढ्यात घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने चाकूने दोरी कापून मुलाचा मृतदेह खाली उतरवला होता. तोवर मुलाचे शरीर हे थंड पडले होते. परिसरातील लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता, नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हे ही वाचा : "पप्पांनी माझ्यावर बलात्कार केलाय..", मुलीने आईला सांगितलं..अन् काय घडलं?
प्रत्यक्षदर्शींचा भलताच संशय
या प्रकरणी घटनेची माहिती मिळताच, फॉरेन्सिक पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, प्रत्यक्षदर्शीनी या प्रकरणावर संशय व्यक्त केली की, छताची आणि भींतीची उंची ही अधिकच कमी असल्याचे सांगितले. कमी उंचीची व्यक्ती किंवा लहान मुल फास कसा लावेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
