DCP वर कुऱ्हाडीने हल्ला, नागपूरचा हिंसाचार होता प्रचंड भयंकर.. वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा!
नागपूरमध्ये झालेला हिंसाचार हा किती भंयकर होता याबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (17 मार्च) नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, ही हिंसाचार आणि दंगली पूर्वनियोजित असल्याचे दिसते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची कोणालाही परवानगी नाही. महाराष्ट्रात शांतता राखली पाहिजे. दरम्यान, नागपुरात नेमकं काय आणि कसं घडलं याबाबत मुख्यमंत्र्यांनी नेमकी माहिती दिली आहे. नागपुरातील हिंसाचारात 33 पोलीस जखमी झाले आहेत, ज्यात 3 डीसीपी दर्जाचे अधिकारी आहेत.
नागपूर हिंसाचारावर विधानसभेत बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने नागपुरात औरंगजेबाची कबर हटविण्यावरून निषेध केला. निदर्शनानंतर एक अफवा पसरली आणि संध्याकाळी या अफवेला वेग आला. ज्यामध्ये असे म्हटले होते जी प्रतीकात्मक कबर जाळण्यात आली त्यावर ठेवण्यात आलेल्या चादरीवर धार्मिक गोष्टी होत्या. याच अफवेमुळे प्रकरण तापले आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. हा एक सुनियोजित हल्ला असल्याचे दिसते.'
12 वाहनांचे नुकसान
या हिंसाचारात 12 दुचाकींचे नुकसान झाले आणि घटनास्थळी 80 ते 100 लोक जमा झाले होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. क्रेन आणि दोन जेसीबीसह चारचाकी वाहने जाळण्यात आली. यावरून हिंसाचाराची तीव्रता लक्षात येऊ शकते. याशिवाय काही लोकांवर तलवारीने हल्लाही करण्यात आला.
हे ही वाचा>> Nagpur: जिथे भडकली हिंसा तिथून किती दूर RSS मुख्यालय आणि CM फडणवीसांचं घर?
डीसीपीवर कुऱ्हाडीने हल्ला झाला
मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, हिंसाचारात 33 पोलिस जखमी झाले, ज्यात 3 डीसीपी दर्जाचे अधिकारी समाविष्ट आहेत. यासोबतच 5 नागरिकांवरही हल्ला झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका डीसीपीवर कुऱ्हाडीने हल्लाही करण्यात आला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.










