बारामती सर्व्हे: पवार, फडणवीसांसह सगळे एकवटले, सुनेत्रा वहिनींची वाट सोपी, पण एक चॅलेंज...

निलेश झालटे

Baramati ByPoll: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा विजय सोप्पा समजला जात आहे. मात्र, असं असलं तरीही यामध्ये नेमक्या काय अडचणीत असू शकतात याबाबत पोलपंडित यांनी एक सर्व्हे केला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी बड्या-बड्या लोकांनी जोरदार प्रयत्न केले मात्र, सुनेत्रा पवारांच्याविरोधात एक नाही दोन नाही तब्बल 22 उमेदवारांनी आव्हान कायम ठेवलंय. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींसाठी ही निवडणूक बिनविरोध झालीच नाही.  या निवडणुकीसाठी एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यात काँग्रेसच्या आकाश मोरे यांचाही समावेश होता. मात्र, अद्यापही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठाम आहेत आणि आपापल्या परीने प्रचारही सुरु आहे.

समजून घ्या बारामतीमधील निवडणुकीचं नेमकं गणित

इकडे सुनेत्रा पवारांसाठी संपूर्ण पवार कुटुंबासह भाजप आणि शिवसेनेनं देखील ताकद लावली आहे.  बारामतीच्या रणधुमाळीत सुनेत्रा पवार निवडून येणार हे जवळजवळ निश्चित मानलं जातंय. असे असले तरी लोकशाहीत निवडणुक प्रक्रियेला मोठं स्थान आहे त्यामुळं निकाल लागेपर्यंत विजयावर शिक्कामोर्तब होत नसतं. अशातच इथे सुनेत्रा वहिनींसाठी वातावरण कसं आहे? कसे-कसे प्रयत्न त्यांच्या विजयासाठी केले जात आहेत. आणि खासकरुन सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदानाच्या टक्केवारीसाठी काय प्लॅन्स आहेत, यासंदर्भात पोलपंडित या सर्व्हे करणाऱ्या संस्थेनं तिथं फिरुन काढलेली काही महत्त्वाची निरीक्षण आणि अंदाज आपण बघणार आहोत.
 
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेस पक्षाने माघार घेतल्यामुळे निवडणूक एकतर्फी होणार हे जवळपास निश्चित आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून 22 उमेदवार आहेत. अजित पवारांनी जेव्हा 2024 ला निवडणूक लढवलेली तेव्हा त्यांच्याविरोधात 23 उमेदवार होते. आता सुनेत्रा पवारांसमोर करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले वगळता इतर अपक्ष उमेदवार हे अल्पपरिचित दिसून येतात.

हे ही वाचा>> Rahuri Bypoll Survey: एक फोन किंगमेकर! पण राहुरीतली टशन संपलेली नाही, तसं झालं तर गेम फिरणार!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बारामतीमधील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले आहे. शिवाय देवेंद्र फडणवीसांसह सर्व पक्षातील नेत्यांची उपस्थिती त्यांच्या सांगता सभेला राहिली. सुप्रिया सुळेंचं भाषण यात चर्चेचा विषय ठरला. 

पवारांचे पारंपरिक विरोधक राहिलेले चंद्रराव तावरे यांचे सहकार्य मिळवण्यासाठी त्यांची रोहित पवार व जय पवार यांनी भेट घेतल्याचंही दिसून आलं. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे हे गाव निहायभेटी आणि प्रचार दौरे करत आहेत.

हे वाचलं का?