‘तुमची लायकी आहे का?’, ठाकरेंवर बावनकुळे-उपाध्येंचा ‘वार’; काय दिलं प्रत्युत्तर?
Maharashtra Political News : बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन, मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना उद्ध्वस्त केल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Political News : बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन, मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना उद्ध्वस्त केल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. उद्धव ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे लोक पक्ष सोडून जात आहेत. तसेच मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? हे तपासून पाहा, असा सल्ला देखील चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना (udhhav thackeray) दिला. (chandrashekhar bawankule and keshav upadhay reply udhhav thackeray maharashtra politics)
ADVERTISEMENT
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वरळीच्या राज्यव्यापी पदाधिकारी शिबिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका करून हल्लाबोल केला होता. या टीकेला आता चंद्रशेखऱ बावनकुळे आणि केशव उपाध्याय यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी देशासाठी संपूर्ण आयुष्य देणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर टीका करु नये, पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? हे तपासून पाहावे, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
हे ही वाचा : मोदी, शाह, फडणवीस; उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात फुंकले रणशिंग, शिवसैनिकांना काय दिला मेसेज?
हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष उद्धव ठाकरेंनी संपवून टाकला. वडिलांनी कमावलं आणि मुलानं खुर्चीसाठी गमावलं, हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे, असे देखील बावनकुळे म्हणाले आहेत.आमची बावनकुळं ही विचारांचे पाईक राहिलेले कुळं आहेत. तुमच्यासारखं खुर्चीसाठी हिंदुत्व सोडणारं हे कुळ नाही, असे देखील बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना फटकारले आहे. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, ही देवेंद्र फडणवीस यांची नव्हे तर तुमची अवस्था,अशी टीका देखील बावनकुळे यांनी यावेळी केली आहे.
हे वाचलं का?
उद्धवजी,
तुम्ही हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन त्यांनी स्थापन केलेली शिवसेना स्वतःच्या मुख्यमंत्रिपदासाठी उध्वस्त केली. तुमच्या नाकर्तेपणामुळे आजही लोक तुमचा पक्ष सोडून जात आहेत. आणि आता तुम्ही मा. @narendramodi जी आणि मा.…— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 18, 2023
मविआ सरकार जनतेचा कौल नाकारून बनवलं होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हे खुर्चीमंत्री होते, तेच आज म्हणतायत की आजही लोकांना तेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे? असा सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केला आहे. स्वतःचं काहीच कर्तृत्व नसलं की मग वडिलांच्या पुण्याईच्या जोरावर सहानुभूतीची मतं मिळवावी लागतात. पण ते हे विसरलेत की सहानुभूती सुद्धा त्यालाच मिळते जो त्याच्या पात्र आहे, अशी टीका देखील केशव उपाध्याय यांनी उद्धव ठाकरेवर केली. तसेच जनतेला सगळं दिसतंय, कळतंय. योग्य वेळी जनता माजी खुर्चीमंत्र्यांना त्यांच्या मनातले मुख्यमंत्री कोण आहेत ते दाखवणारच! तोवर त्यांचं स्वप्नरंजन चालू राहूदे!, असे देखील केशव उपाध्याय म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
राज्यातील मविआ सरकार जनतेचा कौल नाकारून बनवलं होतं. त्या सरकारचे मुख्यमंत्री नव्हे खुर्चीमंत्री होते ते आज म्हणतायत की आजही लोकांना तेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत.
अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे?तुम्हाला जनतेनी कधीच नाकारलं आहे. स्वतःचं काहीच कर्तृत्व नसलं…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 18, 2023
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Uddhav Thackeray : “देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची!”, फडणवीसांना डिवचलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT