मुख्यमंत्र्यांनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची घेतली शपथ, नेमकं प्रकरणं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

CM Eknath Shinde: शिंदे गटाच्या आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यामध्ये (Dasara melava) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर (Maratha Reservation) त्यांनी मोठं अश्वासन दिले. या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार असून माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी (Maratha community) लढणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी मराठा आरक्षणावर बोलत त्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला आश्वस्त करण्याचे काम त्यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

आगामी काळातही महायुतीच

एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत इंडिया आघाडीवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांचेच महायुतीचं सरकार आगामी काळातही येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आरक्षणाला धक्का नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांनी मराठा आरक्षणाविषयी त्यांनी अश्वासन दिले आहे. यावेळी त्यांनी आपण मराठा समाजासोबत असून इतर कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार असल्याचे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Uddhav Thackeray Dasara Melava 2023: उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू, तोफ धडाडणार

टिकणारे आरक्षण

मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार असले तरी हे आरक्षण टिकणारे आरक्षण देण्यात येणार असून मराठा आरक्षणासाठी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

छत्रपतींसमोर घेतली शपथ

मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले तरी यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर जात त्यांनी आरक्षणासाठी शपथही घेतली. शिवछत्रपतींची शपथ घेत त्यांनी मी माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढत राहणार असल्याचे सांगत आता मिळणारे आरक्षण हे टिकणारे आरक्षण असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> मुंबई गुदमरतेय! हवेची गुणवत्ता खालवली, BMC ने घेतला मोठा निर्णय

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT