Exclusive : कोविड सेंटर घोटाळा: IAS संजीव जयस्वाल यांच्या नावे 100 कोटींची मालमत्ता?

मुंबई तक

ADVERTISEMENT

covid center scam case ed summons to ias sanjeev jaiswal property
covid center scam case ed summons to ias sanjeev jaiswal property
social share
google news

मुंबईत सध्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीचे धाडसत्र सुरु आहे. बुधवारी 21 जूनला ईडीने 15 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना समन्स बजावला होता. आज त्यांची चौकशीही झाली. या दरम्यान बुधवारी टाकलेल्या छापेमारीत ईडीला 150 कोटींची स्थावर मालमत्ता सापडली आहे. या 150 पैकी 100 कोटींची मालमत्ता ही आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या नावावर असल्याचा दावा आता केला जात आहे. विशेष म्हणजे कथित कोविड सेंटर घोटाळा झाला तेव्हा जयस्वाल हे मुंबई महापालिकेत अतिरीक्त महापालिका आयुक्त होते. त्यामुळे आता खरंच ही संपत्ती संजीव जयस्वाल यांची आहे का? 100 कोटीच्या दाव्यावर संजीव जयस्वाल यांचे म्हणणे काय आहे? हे जाणून घेऊयात. (covid center scam case ed summons to ias sanjeev jaiswal property)

कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी 15 हून अधिक ठिकाणी छापा टाकला होता. या छाप्यातील एक ठिकाण संजीव जयस्वाल यांचे होते. संजीव जयस्वाल हे सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष होते. कथित कोविड सेंटर घोटाळा झाला तेव्हा जयस्वाल हे मुंबई महापालिकेत अतिरीक्त महापालिका आयुक्त होते. त्यामुळे त्यांची देखील चौकशी सुरू आहे.आता ईडीने टाकलेल्या छाप्यात पोलिसांच्या हाती 24 कागदपत्रे लागली आहे. तसेच 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त एफडीची कागदपत्रेही सापडली आहेत. या कागदपत्रानुसार संजीव जयस्वाल यांच्या 100 कोटीची मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे. या मालमत्ता जयस्वाल कुटुंबियांच्या असून बहुतांशी मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरांसह, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : Exclusive: 17 तास ED ची धाड, सूरज चव्हाणचे WhatsApp चॅट्स आले समोर

संजीव जयस्वाल काय म्हणाले?

100 कोटी मालमत्ता असल्याच्या दाव्यावर संजीव जयस्वाल यांनी त्यांच्या नावे फक्त 34 कोटी मालमत्ता असल्याची माहिती दिली आहे. यासोबत ही मालमत्ता त्यांच्या सासऱ्याने म्हणजेच पत्नीच्या वडिलांनी दिल्याचा दावा केला आहे. यासोबत 15 कोटी रूपयांच्या एफडी देखील सासऱ्याने भेट स्वरूपात दिल्याची माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विशेष म्हणजे ईडीच्या म्हणण्यानुसार छाप्यात सापडलेल्या स्थावर मालमत्तेचे आताचे बाजार मुल्य 100 कोटी आहे. म्हणून त्या मालमत्तेला 100 कोटी म्हटले गेले आहे. दरम्यान आता संजीव जयस्वाल यांच्या दाव्यात किती तथ्य आहे? व 100 कोटीची मालमत्ता ही खरंच संजीव जयस्वाल यांच्या नावे आहे का? याबाबतची माहिती आता ईडीच्या पुढील तपासातून समोर येणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : अजित पवारांचा राष्ट्रवादीमध्येच ‘कार्यक्रम’, शरद पवारांच्या खेळीचा अर्थ काय?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT