Sitaram Yechury Death: सीताराम येचुरी यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
Sitaram Yechury Death News: मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी CPI(M) चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी CPI(M)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन
वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
श्वसनमार्गाच्या संसर्गाने झाले निधन
Sitaram Yechury Death News: नवी दिल्ली: मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी CPI(M)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे आज (12 ऑगस्ट) दिल्लीत निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीताराम येचुरी यांना दिल्लीतील एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सीपीआय (एम) च्या वतीने कळविण्यात आलं की, 'अत्यंत दुःखाने कळवावे लागते की, सीपीआय (एम) सरचिटणीस, आमचे प्रिय कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे आज 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3.03 वाजता एम्स, नवी दिल्ली येथे निधन झाले. त्यांना श्वसनमार्गाच्या संसर्गाने ग्रासले होते, ज्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली होती.'
सीपीआय(एम) नेते येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी तापाच्या तक्रारीनंतर एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे 'इतर' योजना बंद?
सीताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस होते. 1992 पासून ते CPI(M) च्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही होते. येचुरी 2005 ते 2017 पर्यंत पश्चिम बंगालमधून राज्यसभेचे खासदार होते. येचुरी 1974 मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सामील झाले आणि एका वर्षानंतर, ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) मध्ये सामील झाले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
राहुल गांधी यांनी केला शोक व्यक्त
सीताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना राहुल गांधी यांनी X वर पोस्ट केले की, 'सीताराम येचुरीजी माझे मित्र होते. ते भारताच्या विचाराचे संरक्षक होते आणि त्यांना आपल्या देशाची सखोल माहिती होती. त्यांच्यासोबत झालेल्या प्रदीर्घ याची मला नेहमीच आठवण येईल. या दु:खाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि अनुयायांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.'
हे ही वाचा>> Nagpur Car Accident: 'गाडी माझ्या मुलाच्या नावावर...', कार अपघात प्रकरणी बावनकुळेंचं प्रचंड मोठं विधान
'येचुरी यांचे निधन हे राष्ट्रीय राजकारणाचे नुकसान'
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करताना म्हटलं की, 'सीताराम येचुरी यांचे निधन झाल्याचे समजले. ते अनुभवी खासदार होते आणि त्यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणाची हानी झाली आहे. मी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करते.'
ADVERTISEMENT
कोण होते सीताराम येचुरी?
सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी मद्रास (चेन्नई) येथे तेलुगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळात अभियंता होते. त्यांची आई कल्पकम येचुरी या सरकारी अधिकारी होत्या. येचुरी हे हैदराबादमध्ये लहानाचे मोठे झाले आणि त्यांनी ऑल सेंट्स हायस्कूल, हैदराबाद येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं.
ADVERTISEMENT
सीताराम येचुरी यांनी प्रेसिडेंट इस्टेट स्कूल, नवी दिल्ली येथे पुढील शिक्षण घेतलेले आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक परीक्षेत अखिल भारतीय प्रथम क्रमांक मिळवला होता. यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए (ऑनर्स) चे शिक्षण घेतलेले आणि त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. केलं होतं. आणीबाणीच्या काळात जेएनयूमध्ये विद्यार्थी असताना त्यांना अटकही झाली होती.
ADVERTISEMENT