Nagpur Car Accident: 'गाडी माझ्या मुलाच्या नावावर...', कार अपघात प्रकरणी बावनकुळेंचं प्रचंड मोठं विधान
Sushma Andhare on chandrashekhar bawankule: नागपूरमधील ऑडी कार अपघात प्रकरणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नवी माहिती दिली आहे. जाणून नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऑडी कार अपघात प्रकरणावरून नवा राजकीय वाद
सुषमा अंधारेंचे बावनकुळेंच्या मुलावर आरोप
चंद्रशेखर बावनकुळेंचं ऑडी कारबाबत मोठं विधान
Chandrashekhar Bawankuleson and Car Accident: नागपूर: नागपूरमध्ये घडलेल्या ऑडी कार अपघात प्रकरणावरून नवा राजकीय वाद पेटला आहे. मद्यधुंद अवस्थेत महागड्या इलेक्ट्रॉनिक ऑडीने इतरे अनेक गाड्यांना धडक दिल्याचं समोर आलं होतं. ज्याबाबत शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारेंनी एक अत्यंत खळबळ उडवून देणारा आरोप केला आहे. त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं या सगळ्या प्रकरणात नाव घेतलंय. त्यानंतर आता बावनकुळेंनी सुषमा अंधारेंचा आरोप फेटाळून लावले आहेत. पण संबंधित गाडी ही त्यांच्या मुलाच्या नावावर असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून ठाकरे गट आणि भाजप आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतं आहे. (car in the name of my son maharashtra bjp chief chandrashekhar bawankule big statement in the nagpur car accident case audi hits several vehicles in nagpur 2 arrested)
प्रकरण नेमकं काय आहे आणि सुषमा अंधारे यांनी बावनकुळेंवर काय आरोप केलेत, हे आधी पाहूया.
सुषमा अंधारेंचा थेट बावनकुळेंच्या मुलावर आरोप...
'रात्री 12 वाजता पांढऱ्या रंगाच्या ऑडीने 3 ते 4 गाड्यांना धडक दिली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही मात्र, 150 च्या स्पीडने धावणाऱ्या या गाडीने ज्या पद्धतीने धुडगूस घातला त्यामध्ये कोणाचाही जीव जाऊ शकला असता. ज्या गाड्यांना धडक दिली त्या गाडीमधील लोकं आणि आणि इतरांनी या ऑडीतील लोकांना भरपूर चोप दिला आणि त्यांना नजीकच्या पोलीस स्टेशनला नेलं आणि पोलिसांना अर्थातच नेत्याचा मुलगा आहे म्हटल्यावर तक्रार लिहून घ्यायला टाळाटाळ केली. मात्र, प्रचंड गदारोळ झाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता ही तक्रार झाली.'
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
'मात्र, या तक्रारीमध्ये गाडीचा नंबर अजिबात नमूद केला गेला नाही हे फार विशेष आहे. की, गाडीचा नंबरच आला नाही एफआयआरमध्ये. आरटीओने देखील गाडी तपासली नाही.'
हे ही वाचा>> Crime News : मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीलाच चिरडलं! पुण्यात आणखी एक ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार!
'ज्याअर्थी एवढा गदारोळ झाला त्याअर्थी गाडीचा नंबर अनेकांना लक्षात होता. पण पोलिसांनी तो नंबर नोंदवला नाही. या गाडीचे अनेक कागदपत्रं उपलब्ध नाहीत. पण त्या कारबाबत फार काही कारवाई झाली नाही. कारण बावनकुळे साहेबांचा मुलगा आहे म्हटल्यावर कोण एवढी मोठी रिस्क उचलून कामगिरी करेल.'
ADVERTISEMENT
'मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेतंय. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की, संबंधित पोलीस स्टेशनने ही गाडी जमा करून या गाडीतील जी माणसं आहे त्यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे.'
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Mumbai Crime : टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोन गणेशभक्तांना उडवलं, मुलुंड Hit And Run ची Inside Story
दरम्यान, सुषमा अंधारेंनी केलेल्या या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
'ती गाडी माझ्या मुलाच्या नावावर, पण...'
ते म्हणाले की, 'माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. न्याय सर्वांना सारखा असायला हवा मग कुणी राजकारणाशी सबंधित असो किंवा आणखी कुणी असो.' अशी प्रतिक्रिया त्यांनी या सगळ्या प्रकरणावर दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
या घटनेबाबत नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अर्जुन हावरे आणि रोनित चिंतनवार या दोघांना अटक करण्यात आली असून, दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दोघांचाही वैद्यकीय चाचणीचा अहवाल येणं बाकी आहे.
ADVERTISEMENT