Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे 'इतर' योजना बंद?
Eknath Shinde News : लाडकी बहीण योजनेला 45 हजार कोटी लागणार असल्याने राज्य सरकारने इतर योजनांसाठीच्या व खात्यातील निधीत कपात सूरू केली आहे. याचा फटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना बसू लागला आहे. राज्याच्या महसूल व वन विभागाने मंगळवारी एक परिपत्रक काढून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत बंद करण्यात आलेली नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितले
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : लाडकी बहीण योजनेला 45 हजार कोटी लागणार असल्याने राज्य सरकारने इतर योजनांसाठीच्या व खात्यातील निधीत कपात सूरू केली आहे. याचा फटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना बसू लागला आहे. राज्याच्या महसूल व वन विभागाने मंगळवारी एक परिपत्रक काढून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे (Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme) इतर योजना बंद पडतील असे वृत्त अनेक माध्यमांमध्ये झळकले होते. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (ladki bahin yojana sucide farmer family help funde eknath shinde give explanation mukhymantri ladki bahin yojana scheme)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहिण योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत. तसेच शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. या लेखाशिर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. तथापि जेव्हा तरतूद नसते, तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते. मात्र, पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा अर्थ आहे. या बाबतीत स्वयंस्पष्ट आदेश जारी करण्यात आला आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाने आज मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट केले.
हे ही वाचा : Gold Price: बापरे! बाप्पाच्या आगमनाआधीच सोन्याचे भाव गगनाला भिडले!
राज्य शासनाच्या सुधारित परिपत्रकात काय?
दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद केल्याच्या परिपत्रकानंतर राज्य शासनाचे सुधारित परिपत्रक जारी केला आहे. त्यामुळे नव्या परिपत्रकानुसार आत्महत्या केलेल्या शेजाऱ्यांच्या वारसांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून मदत देण्याचा कार्यवाहीचे आदेश देण्यात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी काढलेल्या परिपत्रकानुसार शेतकरी आत्महत्यांचा अंदाज बांधता येत नसल्याचं मदत बंद करण्यात असल्याचं कारण महसूल व वन विभागाने दिलं होतं. याबाबत सरकारवर टीका होण्यास सुरवात झाली. त्यानंतर सरकारने आज सुधारित परिपत्रक काढले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : crime : तरुणासोबत लॉजवर राहिलेल्या अल्पवयीन मुलीनं स्वत:ला संपवलं, कारण वाचून तळपायाची आग मस्तकात जाई
श्रेयवादाच्या लढाईचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत
राजकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या हसत खेळत चर्चेत, मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रसिद्धी करताना 'मुख्यमंत्री' हा शब्द वापरला जात नसल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी देखील हसत खेळत धनंजय मुंडे यांना याचा जाब विचारला. यावर धनंजय मुंडे यांनी असं काही नसून बीडच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नावांचा उल्लेख तसेच फोटो आणि योजनेचे नाव देखील योग्यरीत्या वापरण्यात आल्याच स्पष्ट केलं. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण लवकरच या योजनेच्या अनुषंगाने एक एसओपी आणूयात अशी भुमिका मांडली, अशी सुत्रांकडून माहिती मिळतेय.
ADVERTISEMENT