दिपके, दास आणि रांका कुठे आहेत? दिल्ली पोलिसांचे उत्तर आले, सांगितला पुढचा प्लॅन

मुंबई तक

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका हे अद्यापही पोलीस कोठडीत आहेत. या तिघांनाही प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

CJP Protest
CJP Protest
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दिपके, दास आणि रांका कुठे आहेत?

point

दिल्ली पोलिसांचे आले उत्तर

point

सांगितला पुढचा प्लॅन

CJP Protest : दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना मुंबईतून नवी दिल्लीत पोहोचताच विमानतळावर ताब्यात घेतले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तिघांनाही औपचारिकपणे अटक करण्यात आलेली नसून, CRPC कलम 107/151 अंतर्गत खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात ठेवण्यात आले आहे. हे नेते कोणताही मोठा गुन्हा करू शकतात किंवा शांतता भंग करू शकतात, या शक्यतेमुळे कलम 170 अन्वये विनावॉरंट ही कारवाई करण्यात आली आहे.

कुटुंबियांना अधिकृत सूचना नाही

या कारवाईनंतर CJP चे संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहून या तिन्ही नेत्यांच्या स्थितीबद्दल सविस्तर माहिती मागितली होती. पक्षाने आरोप केला होता की, नेत्यांना ताब्यात घेऊन 12 तास उलटून गेल्यानंतरही त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही. तसेच, वकिलांनाही याबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असून, त्यांना नेमके कुठे ठेवले आहे आणि कोणत्या एजन्सीने ताब्यात घेतले आहे, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

हे ही वाचा : विद्यार्थ्यांसाठी उपोषण करणाऱ्या नितीन गितेचं जोरदार भाषण, रोहित पवार पण हसले

दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणार

कायद्याच्या नियमांनुसार पोलिसांना कोणत्याही व्यक्तीला 24 तासांपेक्षा जास्त काळ विनाकारणात ताब्यात ठेवता येत नाही आणि ठरवून दिलेल्या मुदतीत त्याला मॅजिस्ट्रेटसमोर उभे करणे बंधनकारक असते. या प्रक्रियेचे पालन करत दिल्ली पोलीस आता अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर (Executive Magistrate) सुनावणीसाठी हजर करणार आहेत.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात कोरडं हवामान, काही भागांत अंगाची होणार लाही लाही

'औपचारिक अटक मानू नये'

मॅजिस्ट्रेटसमोर हजर केल्यानंतर, कायद्यातील तरतुदीनुसार भविष्यात शांतता टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्याकडून एक हमीपत्र किंवा बॉण्ड (Bond) लिहून घेतला जाईल, त्यानंतर त्यांना सोडून दिले जाण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या मते ही केवळ सुरक्षेच्या दृष्टीने केलेली एक कायदेशीर प्रक्रिया असून, याला औपचारिक अटक मानले जाऊ नये.