'पुणे पोलिसांनी मो.रा. वाळंबे वाचा'; विवेकानंद पाटीलची जोरदार फटकेबाजी

मुंबई तक

Pune MPSC Protest : पुण्यातील एमपीएससी विद्यार्थी आंदोलनात विवेकानंद पाटील यांनी सरकार आणि पुणे पोलिसांवर टीका केली. विद्यार्थ्यांवरील गुन्हे, पेपरफुटीचे आरोप आणि पदभरतीच्या मागण्यांवर त्यांनी भूमिका मांडली.

ADVERTISEMENT

Pune MPSC Protest
Pune MPSC Protest
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'पुणे पोलिसांनी मो.रा. वाळंबे वाचा'

point

विवेकानंद पाटीलची जोरदार फटकेबाजी

Pune MPSC Protest : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला विविध राजकीय नेते आणि कार्यकर्ते भेट देत आहेत. या आंदोलनस्थळी विवेकानंद पाटील या तरुणाने केलेल्या भाषणाची चर्चा होत आहे. राज्यातील पदभरती, परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. तसेच विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांवरून पुणे पोलिसांनाही सुनावले. “पुणे पोलिसांनी मो.रा. वाळंबे वाचा,” असे म्हणत त्यांनी पोलिसांना विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांच्याकडून निबंध लिहून घेऊन सोडून देण्याची सूचना केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारातील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा ; 'जे करायचे आहे ते करा, 10 हजार, 20 हजार, 50 हजार पोलीस..', राहुल गांधीचा CJP च्या आंदोलनावरील Video

देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती

विवेकानंद पाटील यांनी आपल्या भाषणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली. विद्यार्थ्यांचे आंदोलन हा केवळ कार्यक्रम असल्याचे म्हणण्याऐवजी त्यांच्या अडचणी समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनस्थळी विविध राजकीय नेते येत असले, तरी विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकारला का दिसत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे यावे, आपण एक पाऊल मागे घेण्यास तयार आहोत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मात्र, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची धार कमी होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली.