Milind Deora : ‘हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है!’, CM शिंदेंनी कुणाला दिला इशारा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

eknath shinde warn opposition leader maha vikas aghadi milind deora join shivsena shinde
eknath shinde warn opposition leader maha vikas aghadi milind deora join shivsena shinde
social share
google news

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांचे शिवसेनेत स्वागत केले. त्याचसोबत ‘हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (eknath shinde warn opposition leader maha vikas aghadi milind deora join shivsena shinde)

मिलिंद देवरा यांचा शिवसेनेते पक्ष प्रवेश पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावूरन बोलत होते. मी, मिलिंद देवरा आणि वहिनींचे शिवसेनेत स्वागत करतो. कुठलाही निर्णय घेताना यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते. आपण निर्णय घेताना ज्या भावना होत्या त्याचा दीड वर्षापूर्वी माझ्या मनात होत्या. मी ज्या वेळेस हा निर्णय घेतला तेव्हा श्रीकांत शिंदे यांच्या आईला विश्वासात घेतलं होत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा : Milind Deora : “जर मोदी म्हणाले की, काँग्रेस चांगला पक्ष तर…”, देवरांचा ठाकरे-काँग्रेसवर वार

काही ऑपरेशन असे करायचे की सुई पण टोचली नाही पाहिजे, कुठे टाकाही लागला नाही पाहिजे. गेल्या 50 वर्षापासून काँग्रेस सोबत आपली नाळ जुडली होती. आपण खासदार आणि मंत्रीही होतात. पण असे काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. डॉक्टर नसताना मी दीड वर्षापूर्वी ऑपरेशन केलं. आरोप प्रत्यारोप न करता आपलं काम करतं राहायचं. मी सकाळी उठून रस्ते धुण्याचे काम करत असतो. आता एक अभ्यासू आणि संयमी नेता आपल्याला मिळाला आहे. हा फक्त ट्रेलर आणि पिक्चर अभी बाकी आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काही लोक काल श्रीकांतच्या लोकसभा मतदार संघात गेले होते, म्हणाले रोडसफाई, धुलाई सुरू आहे, आता निवडणूकीत यांना साफ करा. लोक रस्ते धुणाऱ्यांना, साफसफाई करणाऱ्यांना लोकांची कामे करणाऱ्यांना कसे काय साफ करतील? असा सवाल शिदेंनी उपस्थित करत ते तर घऱी बसलेल्यांना साफ करतील, असा टोला ठाकरेंना लगावला. जनता सुज्ञ आहे, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Ram Mandir : ‘मी इथे शहीद झालो तर राम मंदिराचा…’, अडवाणींचा ‘तो’ किस्सा काय?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT