Sanjay Raut : ‘आजही मला 100 कोटींची ऑफर, पण…’; सुनील राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

even today i am offered 100 crores mla sunil raut big secret explosion mp sanjay raut brand
even today i am offered 100 crores mla sunil raut big secret explosion mp sanjay raut brand
social share
google news

Sunil Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने बंड केले होते. त्यावेळेपासून रोज शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या आरोप प्रत्यारोपांनी राजकारण ढवळून निघत आहे. त्यातच आता खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत (sunil raut) यांनी निष्ठा काय असते ते सांगत संजय राऊत नावाचा ब्रँड माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे आजही मला 100 कोटींची ऑफर आली असली तरी आजच्या घडीला माझा विचार बदलणार नाही, कारण आम्ही निष्ठावंत असून आम्ही आमचा विचार बदलणार नाही असं त्यांनी स्पष्टच सांगितले. आमदार सुनील राऊत यांनी बोलताना शिंदे गटावर निशाणा साधला. (even today i am offered 100 crores mla sunil raut big secret explosion mp sanjay raut brand)

ADVERTISEMENT

कार्यकर्त्यांना फोडण्याचं काम

यावेळी त्यांनी माजी नगरसेवक यांच्यासाठी आपल्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काय काय केले आहे. तेही त्यांनी यावेळी सांगितले. उपेंद्र सावंत यांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पैशासाठी प्रवेश करत निधीसाठी त्यांनी 15 कोटी आणि 5 कोटी कॅशची ऑफर असल्याचे त्यांनी मला 10 दिवसापूर्वीच सांगितले होते. मात्र त्यावेळी त्यांनी मला मी निष्ठावंत आहे, मी घरी बसेल मात्र मी शिंदे गटात जाणार नसल्याचा शब्द त्यांनी मला दिला होता.

हे ही वाचा >> MNS:रस्ते, टोल.. अन् कोकणी माणूस.. राज ठाकरेंनी टार्गेट का बदललं, मनात नेमकं काय?

मी नसतो तर…

त्यानंतर त्यांना मी किती तरी वेळा त्याला फोन केले मात्र त्याने माझे फोन घेतले नाहीत. त्याने फोन घेतला नाही म्हणून त्याच्या बहिणीला फोन केले, आणि बहिणीला सांगितले की, त्याच्या मागे मी नसतो तर तो आज जेलमध्ये असता अशा शब्दात शिंदे गटात गेलेल्या उपेंद्र सावंत यांच्यावर केला आहे.

हे वाचलं का?

मी निष्ठावंत म्हणून…

आमदार सुनील राऊत यांनी उपेंद्र सावंत यांचे उदाहरण देताना त्यांनी आपल्यालाही पक्षप्रवेशाची कशी ऑफर होती तेही सांगितले. उपेंद्र सावंत हे आता शिंदे गटात गेले असले तरी त्याआधीच मला 100 कोटींची ऑफर होती, मात्र बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरील निष्ठेमुळे मी ती ऑफर घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. ती शंभर कोटीची ऑफर का नाकारली हे सांगताना त्यांनी आपल्या नावामागे खासदार संजय राऊत नावाचा ब्रँड असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नसल्याचा दावा केला आहे.

हे ही वाचा >> CM Shinde Vs Ajit Pawar: अजित पवारांमुळे मुख्यमंत्र्यांचा ‘इगो’ दुखवला? फाईलींचा प्रवासच बदलला…

एकही रुपयाचाही फंड नाही

सध्याच्या भाजप आणि शिंदे गटाच्या राजकारणावर निशाणा साधताना ते म्हणाले की, आमचीच माणसे विकत घेऊन, आमच्याच माणसांना आमच्यासमोर उभा केली जातात. आम्ही निष्ठावंत असल्यामुळेच आम्हाला आता एकही रुपयाचा फंड सरकारकडून मिळत नाही. माझ्यावर 35 कोटींचे कर्ज आहे, कारण 35 कोटींची कामं मी केली आहेत, मात्र सरकार आजही मला पैसे देत नाही असा थेट आरोपच त्याांनी सरकारवर केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT