Uddhav Thackeray : ‘आमचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणारं आणि तुमचं…’ ठाकरेंनी भाजपला घेरलं

ADVERTISEMENT

former chief minister uddhav thackeray criticizes bjp Hindutva criticizes narayan rane, deepak Kesarkar
former chief minister uddhav thackeray criticizes bjp Hindutva criticizes narayan rane, deepak Kesarkar
social share
google news

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगड, रोहा नंतर आज सावंतवाडीतून बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), नारायण राणे, (Narayan Rane), दीपक केसरकर आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर सडकून टीका केली. भाजपवर टीका करताना त्यांनी हिंदुत्वावरुन जोरदार निशाणा साधला. ‘आमचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणारं आहे तर तुमचं हिंदुत्व घरं पेटवणारं आहे’ असं म्हणत भाजपला हिंदुत्वाच्या मुद्यावरून त्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

‘तुमचं हिंदुत्व तर..’

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधताना सांगितले की, ‘तुम्ही हिंदुत्वाच्या मोठ्या बाता करत असला तरी आता मी जिथे जातो तिथं लोकं माझ्यासोबत येत आहेत. विशेष म्हणजे हिंदू तर आहेतच मात्र आता रायगडच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात मुस्लीमही आले आहेत. कारण त्यांना आता माहिती आहे की, यांचे हिंदुत्व वेगळं आहे. यांचे हिंदुत्व म्हणजे धर्मा धर्मामध्ये आगी लावणारं हिंदुत्व नाही, तर आमचं हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारं आहे, आणि तुमचं हिंदुत्व हे घरं पेटवणारं आहे ‘ अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

हे ही वाचा >> Baramati Lok Sahba : सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांनी फुंकले रणशिंग; केली मोठी घोषणा

गद्दारीचा शिक्का

उद्धव ठाकरे यांनी आज सावंतवाडीतून बोलताना राणे पिता पुत्रांसह त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. इथला गद्दार डबल गद्दार आहे असं सांगत त्यांनी एकदा तुम्हाला गद्दारीचा शिक्का मिळाला आहे तो कधीही पुसू शकत नसल्याचे सांगत त्यांनी केसकरांसह राणेंवरही जोरदार निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हुकूमशाही गाडावी लागेल

उद्धव ठाकरे यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, ‘हे हुकुशाहाचं सरकार नको कारण पुढच्या वर्षी जर हेच सरकार पुन्हा आले तर आता प्रजासत्ताकही साजरा करता येणार तर हुकूमशाहाचं राज्य येईल त्यामुळे आता साऱ्यांनी एकवटून हुकूमशाही गाडावी लागेल आणि त्यासाठी तुमची साथ लागेल’ असं आवाहनही त्यांनी कोकणवासियांना केले.

 ‘कोंबडी चोराची पिसं’

‘भाजारबुणगे, भेकड, भेकाडांच्या फौज घेऊन तुम्हा माझ्यावर चाल करता’ म्हणत त्यांनी ईडीच्या कारवाईवरूनही त्यांनी केंद्र सरकारवरही जोरदार निशाणा साधला. यावेळी राणेंवर टीका करताना त्यांनी, ‘कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढली’ असल्याचे सांगत त्यांनाही त्यांनी डिवचले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : ‘मिंधेंनीच मला गुंड बनवलं’, ठाकरेंची CM शिंदेंवर तोफ; गोळीबारावर काय बोलले?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT