शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचे अपहरण, काय आहे Inside Story?

मुंबई तक

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचं अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचे अपहरण
शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचे अपहरण
google news

पुणे: राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचे अपहरण झाले असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ऋषीराज सावंत याचे पुणे विमानतळावरून अपहरण करण्यात आले आहे. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 5 वाजता स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाले अशी प्राथमिक माहिती असून पोलीस याचा शोध घेत आहेत. 

स्वीफ्ट गाडीतून चार लोक उतरले आणि त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे तपास सुरू केला आहे. सावंत यांना गिरीराज व ऋषीराज अशी 2 मुले आहेत. गेल्या काही महिन्यापासुन सावंत कुटुंब हे टार्गेटवर असल्याचे काही घटनावरून समोर आले आहे. सावंत यांचे पुतणे धनंजय यांच्या घरासमोर गोळीबार त्यानंतर धमकी व आता अपहरण अशी घटना घडली आहे.

हे ही वाचा>> CM Devendra Fadnavis राज ठाकरे यांच्या भेटीला, राऊत म्हणाले शिवाजी पार्कवर कॅफे उघडलाय...

पुणे पोलिसांनी काय दिली माहिती?

'पोलीस कंट्रोल रुमला एक माहिती मिळाली की, तानाजी सावंत साहेबांचा मुलगा यांचं कोणी तरी घेऊन गेलेलं आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ सर्व टीम शोध घेण्यासाठी रवाना झाल्या आहेत.'

'तो पुण्यावरून फ्लाइटने गेला आहे. फ्लाइट कोणत्या दिशेने चालली आहे याची माहिती घेणं सुरू आहे. त्यांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबद्दल पोलिसात अपहरणाची तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने क्राइम ब्रांचकडे हा तपास देण्यात आला आहे.  प्राथमिक माहिती हीच आहे.' अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

हे वाचलं का?