”आरक्षण हवंय, पण बाबासाहेबांच नाव घ्यायचं नाही”, गोपिचंद पडळकरांनी जरांगेंना सुनावलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

gopichand padalkar criticize manoj jarange patil dr babasaheb ambedkar maratha reservation obc reservation
gopichand padalkar criticize manoj jarange patil dr babasaheb ambedkar maratha reservation obc reservation
social share
google news

Gopichand Padalkar Criticize Manoj jarange Patil, Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)  मुद्दा पेटलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आहेत. असे असतानाच धनगर समाजही आक्रमक झाला आहे. धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरू केली आहे. याच आंदोलनातून बोलताना भाजप आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मनोज जरांगे पाटलांना अनेक सवाल केले आहेत. आरक्षण मागतायतं, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करत नाही आणि नावही घ्यायला तयार नाही, अशा शब्दात गोपिचंद पडळकरांनी जरांगे पाटलांना सुनावले आहे. (gopichand padalkar criticize manoj jarange patil dr babasaheb ambedkar maratha reservation obc reservation)

ADVERTISEMENT

भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्या एक्स या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत त्यांनी वरील विधान केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेत आरक्षण दिले. म्हणूनच आमचे एकच साहेब बाबासाहेब आहेत. पण काही पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांनी निर्माण केलेले जातीयवादी माणूस आरक्षण मागतोय, पण ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान व त्यांचे नाव घ्यायला तयार नाही, अशी टीका पडळकरांनी जरांगेचे नाव न घेता केली.

हे ही वाचा : IPL Transfer Window 2024 : हार्दिक पांड्याची घरवापसी, मुंबई इंडियन्स मोजणार इतके ‘कोटी’?

हे वाचलं का?

आम्ही न्यायालयात लढतोय, रस्त्यावरचीही लढाई लढतोय आणि सरकारकडेही पाठपुरावा करतोय. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सविधानात दिलेले आरक्षण आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रात आणि देशात धनगरांचा एकच साहेब आहे, तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब, असे गोपिचंद पडळकर म्हणाले आहेत.

पण काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिळावळ या राज्यात तयार केल्या आणि त्या आरक्षण मागतायत. पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान पण करत नाही आणि ते बाबासाहेबांचे नावही घ्यायला तयार नाही, अशा शब्दात पडळकरांनी जरांगेना सुनावलं. हे आरक्षण मागतायत, पण बाबासाहेबांचे नाव आम्ही घेणार नाही. असे कसे चालेल आहे. आम्ही आज बाबासाहेबांमुळे आहोत हे आम्ही मान्य करतो, असे देखील पडळकर म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Gujarat Crime: चप्पल तोंडात घातली, बेल्टने मारलं… बॉस बनली ‘लेडी डॉन’!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT