Maratha Reservation : ‘…याला संपवायला पाहिजे होता’, सदावर्तेंबद्दल शिंदे गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान

ADVERTISEMENT

gunaratna sadavarte should have been terminated opposed maratha reservation mla sanjay gaikwad controversial statement
gunaratna sadavarte should have been terminated opposed maratha reservation mla sanjay gaikwad controversial statement
social share
google news

MLA Sanjay Gaikwad: महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन पेटले आहे. सरकारने मराठा आरक्षणावर तात्काळ तोडगा काढून मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावी अशी मागणी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारकडे केली आहे. तर दुसरीकडे ॲड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी त्याला विरोध दर्शवल्याने जरांगे पाटील विरुद्ध सदावर्ते असं युद्ध आता रंगले आहे. त्यातूनच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. (gunaratna sadavarte should have been terminated opposed maratha reservation mla sanjay gaikwad controversial statement)

आरक्षणाचा वाद विकोपाला

आमदार संजय गायकवाड यांनी गुणरत्न यांच्यावर टीका करत त्यांनी, त्यांची गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे, याला संपवायला पाहिजे होता असं धक्कादायक विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यामुळे आत वाद आणखी विकोपाला जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.

सदावर्तेंच्या कारवर हल्ला

आंतरवाली सराटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत आंदोलन छेडले आहे. त्यामुळे सरकारसह विरोधकांनीही त्यांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. तर दुसरीकडे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनला विरोध दर्शवत जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी टीका केली होती. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर हल्ला करुन तोडफोड केली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> PM मोदींची अजित दादांसमोरच शरद पवारांवर जहरी टीका

सदावर्तेंचा नालायकपणा

त्या घटनेनंतर आमदार संजय गायकवाड यांनी धक्कादायक विधान करत गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच मराठा आरक्षण हिसकावले गेले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात जात न्यायालयात प्रखर बाजू मांडल्यामुळेच मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळत गेल्याची टीका आमदार गायकवाड यांनी केली आहे.

आणखी नुकसान होणार

मराठा आरक्षणाला गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून विरोध होत असल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर राग व्यक्त केला आहे. त्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्यावर राग व्यक्त करत त्यांच्या कारचे नुकसान केले आहे. त्याच बरोबर त्यांच्या या कृतीमुळेच आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचेही आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>‘एक मोदी, सब पे भारी’, CM शिंदेंची शिर्डीत मोदींसमोरच घोषणा, PM ही खुदकन हसले

‘हा’ संपला असता तर

आमदार संजय गायकवाड यांनी सदावर्ते यांच्यावर टीका करताना म्हणाले की, त्यांची, गाडी तोडली ही शिक्षा कमीच आहे, त्याला संपवायला पाहिजे होता असं धक्कादायक विधानही त्यांनी केले आहे. गुणरत्न सदावर्ते हा संपला असता तर मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता असं विधान एका लोकप्रतिनिधीने केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच त्यांच्या कारवर हल्ला केला ते कमी झाले आहे. त्याची व्यवस्था चांगली करायला पाहिजे होती असं वक्तव्यही त्यांनी यावेळी केले आहे.

ADVERTISEMENT

राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन छेडल्यानंतर आता आंतरवली सराटीमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मत व्यक्त करत काही उत्साही कार्यकर्ते गावबंदी करत आहेत. मात्र अशी भूमिका घेऊ नये असं आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनीसुद्धा सांगितले आहे की, आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. त्यामुळे सर्वांनी संयमाची भूमिका घेतली पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT