Karnataka Election: मातब्बर मंत्र्याला लोळवून अनाथ पोरगा झाला आमदार!
Karnataka Election Result: कर्नाटक निवडणुकीत प्रदीप ईश्वर या नवख्या उमेदवाराने मातब्बर मंत्री के. सुधाकर यांचा पराभव केल्याचं समोर आलं आहे. जाणून घ्या नव्या आमदार प्रदीप ईश्वरने कशी केली ही कामगिरी.
ADVERTISEMENT

Pradeep Eshwar: बंगळुरू: हातात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, शेकडो कार्यकर्तांचा गराडा आणि घोषणाबाजी. अशी होती कर्नाटकच्या एका तरुण आमदाराची विजयी रॅली. एकीकडे कर्नाटकात कोण मुख्यमंत्री होणार याबाबतची चर्चा सुरु असताना दुसरीकडे कर्नाटकच्या सर्वात तरुण आमदाराची चर्चा होऊ लागली आहे. या तरुण आमदाराने थेट आरोग्यमंत्र्याचाच पराभव केला आहे. कर्नाटकातला हा आमदार नेमका कोण आणि त्याने थेट आरोग्यमंत्र्यालाच कसं हरवलं या सगळ्याची इंटरेस्टिंग गोष्ट आपण सविस्तरपणे पाहूयात. (in karnataka election pradeep eshwar created history by defeating bjp health minister k sudhakar)
आरोग्यमंत्र्याचा नेमका कसा केला पराभव?
ज्या आमदाराने भाजपच्या आरोग्यमंत्र्याचा दणदणीत पराभव केला आहे त्याचं नाव आहे प्रदीप इश्वर. प्रदीपने कर्नाटकचे दिग्गज नेता आणि आरोग्यमंत्री के. सुधाकर यांचा तब्बल 10 हजार 642 मतांनी पराभव केला आहे. प्रदीपचा आमदार होण्यापर्यंतचा प्रवास तसा सोपा नव्हता. प्रदीप हा अनाथ आहे. तो सर्वात आधी चर्चेत आला तो 2016 साली कर्नाटकमध्ये झालेल्या एका आंदोलनामुळे. बंगळुरूच्या देवनहल्ली मध्ये विजीपुरा या भागाला तालुका घोषित करण्याची मागणी आंदोलनांकडून करण्यात येत होती.
या आंदोलनामुळे तालुका तर मिळाला नाही पण प्रदीप मात्र फेमस झाला. या आंदोलनानंतर प्रदीपने के. सुधाकर यांच्या विरोधात युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा >> कर्नाटक निकालानं CM शिंदेंना इशारा; ‘त्या’ बंडखोर आमदारांचं झालं तरी काय?
2018 मध्ये पोलिसांच्या लाठी हल्ल्यात एका काँग्रेसी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. या विरोधात प्रदीपने आवाज उठवला होता. ज्यामध्ये त्याला अटक देखील करण्यात आली होती. या सगळ्या घटनेमुळे प्रदीपच्या प्रसिद्धीत वाढच झाली. सुधाकर यांना हरवू शकेल असा उमेदवार काँग्रेसला हवा होता. प्रदीपच्या रुपाने त्यांना असा उमेदवार मिळाला. प्रदीपने पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली देखील.