India Meeting : शरद पवारांसह 13 नेते समितीत, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा समावेश
india alliance Coordination Committee list : इंडिया आघाडीची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात शरद पवार यांच्यासह 13 नेत्यांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
INDIA Meeting Mumbai Updates: इंडिया आघाडीच्या 28 विरोधी पक्षांचे नेते दोन दिवसांपासून मुंबईत मंथन करताहेत. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हे नेते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी रणनीती आखण्याबद्दल चर्चा केली जात आहे. गुरुवारी म्हणजे 31 ऑगस्टला बैठकीच्या पहिल्या दिवशी, इंडिया आघाडीने निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा निर्णय घेतला आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत NDA विरुद्ध लढण्यावर लक्ष केंद्रीत केलं.
ADVERTISEMENT
2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा मुकाबला करण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत सुरू आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी नेत्यांनी ग्रुप फोटो काढून एकतेचा संदेश दिला. याशिवाय शरद पवार, तेजस्वी यादव यांच्यासह 13 नेत्यांचा समन्वय समितीत समावेश करण्यात आला आहे.
वाचा >> Sudhir More : ठाकरे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाचे झाले अनेक तुकडे
संयोजकांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याशिवाय INDIA alliance चा नवा लोगो लाँच होणार नाही. याशिवाय वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. आज बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा होणार आहे. मोदी सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. यामध्ये वन नेशन वन इलेक्शनचे विधेयक येऊ शकते, असे मानले जात आहे.
हे वाचलं का?
इंडियाच्या बैठकीत हे ठराव करण्यात आले मंजूर
या बैठकीत विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याचा ठराव मंजूर केला. विविध राज्यांमध्ये जागावाटपाची चर्चा लवकरच सुरू केली जाणार असून, ती लवकरात लवकर संपुष्टात येईल.
जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष लवकरात लवकर देशाच्या विविध भागात जाहीर सभा घेतील, असा ठराव बैठकीत करण्यात आला.
ADVERTISEMENT
वाचा >> Kaushal Kishore : केंद्रीय मंत्र्याचे घर, मुलाचे पिस्तूल, मित्राचा मृत्यू कसा; Inside Story
भारत आघाडीच्या नेत्यांनी ‘जुडेगा भारत, जीतेगा इंडिया’ या थीमसह विविध भाषांमधील आपापल्या प्रचार आणि मीडिया धोरण आणि अभियानांमध्ये समन्वय साधण्याचा संकल्प केला.
ADVERTISEMENT
13 सदस्यांची समन्वय समिती स्थापन
विरोधी आघाडीच्या बैठकीत 13 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसकडून केसी वेणुगोपाल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, द्रमुककडून एमके स्टॅलिन, शिवसेनेकडून (युबीटी) संजय राऊत, आरजेडीकडून तेजस्वी यादव, टीएमसीकडून अभिषेक बॅनर्जी, आपकडून राघव चढ्ढा, सपाकडून जावेद खान, जेडीयूकडून लल्लन सिंह, हेमंत सिंह, झारखंड मुक्ती मोर्चाकडून सोरेन, डी राजा, एनसीचे ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, समन्वयक अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत.
कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीवरून वाद
मुंबईतील इंडिया बैठकीत कपिल सिब्बल यांच्या अनपेक्षित प्रवेशामुळे काँग्रेस नेते संतापले. सिब्बल या बैठकीसाठी अधिकृत निमंत्रित नव्हते. मात्र त्यांच्या उपस्थितीने काँग्रेस नेते अस्वस्थ झाल्याचे दिसले. फोटो सेशनमध्ये त्यांच्या उपस्थितीबद्दल काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
केसी वेणुगोपाल यांनीही कपिल सिब्बल यांच्या अचानक येण्याबाबत उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली. यानंतर फारुख अब्दुल्ला आणि अखिलेश यादव यांनी वेणुगोपाल यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनीही मला कुणावरही आक्षेप नसल्याचे सांगितले. यानंतर कपिल सिब्बल यांनी फोटो सेशनमध्ये भाग घेतला. कपिल सिब्बल यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा राजीनामा देऊन सपामध्ये प्रवेश केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT