Kangana Ranaut : मुख्यमंत्र्यांच्या सूटमध्ये राहण्याची 'बॉलिवूड क्वीन'ची इच्छा, पण कंगनाचा भ्रमनिरास कोणी केला?
Kangana Ranaut News : अभिनेत्री कंगणा रणौत आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महाराष्ट्र सदनात पोहोचल्या होत्या. महाराष्ट्र सदनात कंगणा खोली मागण्यासाठी गेल्या असल्याची सुत्रांची माहिती आहे. यावेळी महाराष्ट्र सदनात पोहोचल्यावर तेथील अधिकाऱ्यांनी तिला पहिल्या
ADVERTISEMENT
Kangana Ranaut visit Maharashtra Sadan : 18 व्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनेक नवनिर्वाचित खासदारांनी खासदारकीची शपथ घेतली. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या अभिनेत्री कंगणा रणौतने देखील खासदारकीची शपथ घेतली. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना महाराष्ट्र सदनात दाखल झाली होती. यावेळी तिने राहण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या सुटची माणगी केली होती. यासाठी तिने भाजपच्या एका नेत्याद्वारे दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला, अशी सुत्रांची माहिती आहे.मात्र आता तिचा भ्रमनिरास झाल्याची माहिती समोर आली आहे. (kangana ranaut demand chief minister suite in maharashtra sadan himachal pradesh mandi)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र सदनाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कंगणा रणौत आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महाराष्ट्र सदनात पोहोचल्या होत्या. महाराष्ट्र सदनात कंगणा खोली मागण्यासाठी गेल्या असल्याची सुत्रांची माहिती आहे. यावेळी महाराष्ट्र सदनात पोहोचल्यावर तेथील अधिकाऱ्यांनी तिला पहिल्या मजल्यावर नेले होते.
हे ही वाचा : भाऊ तोरसेकरांना पाठवलेली कायदेशीर नोटीस भाजपने का घेतली मागे?
कंगना मुंबईत राहते म्हणून तिने अधिकाऱ्यांना एका खोलीची विनंती केली होती, अशी सुत्रांची माहिती आहे. यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी तिला एक खोली दाखवली पण कंगना खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे सांगून खोली नाकारली होती. त्यानंतर कंगनाला एक खोली दाखवण्यात आली जी सामान्यतः राज्यातील एका मंत्र्याला दिली जाते. त्या खोलीला देखील तिने नकार दिला होता.
हे वाचलं का?
अखेर कंगनाने महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूटच मागितला. पण नियमानुसार हा सुट दुसऱ्या कोणाला देता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सदनाकडून मुख्यमंत्र्यांचा सुट मिळणार नाही, असं स्पष्टीकरण देण्यात आलं. त्यासाठी कंगनाने महाराष्ट्रातील बड्या नेत्यांनाही तिने फोन केला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.मात्र या नेत्याने देखील तिची मदत केली नाही. त्यामुळे कंगणाचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.
हे ही वाचा : Budget 2024: पंतप्रधान मोदींचं ब्रम्हास्त्र, संपूर्ण गेमच पलटणार?
दरम्यान या सर्व घटनेनंतर कंगना 15 मिनिटांनी तेथून निघून गेली होती. जेव्हा मीडियाने तिला तिच्या भेटीचे कारण विचारले असता,तिने सांगितले की ती एका मैत्रिणीसोबत कॉफी प्यायला आली होती, पण ती महाराष्ट्र सदनाच्या कॅन्टीनमध्ये गेली नाही उलट ती थेट सदनाच्या पहिल्या मजल्यावर गेली.पण कंगना कॉफीसाठी आली होती असा दावा करत असताना, ही भेट निवासाशी संबंधित होती असे कसे म्हणता येईल?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT