Eknath Shinde : '...तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू', धाराशीवमध्ये शिंदे काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana eknath shinde big statement give us bigger mandate we will double ladki bahin amount
धाराशीवमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू

point

लाडकी बहीण योजनेचे पैसै 3000 रूपये करू

point

लाडक्या बहिणीची साथ देणारा हा एकनाथ आहे

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून सध्या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होत आहेत. पण विधानसभा निवडणुकीत जर आम्हाला मोठा जनादेश दिला, तर आम्ही लाडकी बहिण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे दुप्पट करून 3000 रूपये करू, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लाडक्या बहिणींना दिला आहे. (ladki bahin yojana eknath shinde big statement give us bigger mandate we will double ladki bahin amount) 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी धाराशीवमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठं विधान केले. जर आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने सत्ताधारी महायुतीला "मोठा जनादेश" दिला तर सरकार 'लाडकी बहीण' योजनेची मासिक आर्थिक मदत दुप्पट करून 3,000 रुपये करेल, असे विधान शिंदे यांनी केले आहे. 

हे ही वाचा : श्रीमंतांना लाडू अन् गरिबाला बाहेर काढू! 'लालबागचा राजा' मंडळात का होतोय भेदभाव? उद्योगपतीनं शेअर केला VIDEO

"आम्ही लाडकी बहिन योजना सुरू केली, ज्यामध्ये पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. तुम्ही आमची ताकद वाढवली तर आम्ही मासिक रक्कम 2,000 रुपये करू. तसेच तुम्ही निवडणुकीत मोठा जनादेश दिला, तर आम्ही रक्कम वाढवून 3,000 रुपये करू', असे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच "विरोधक आमच्यावर टीका करतात, राज्य सरकार नंतर रिकामी तिजोरी दाखवून योजना बंद करेल. 'एकदा बाण धनुष्यातून सुटला तो सुटला तसा मुख्यमंत्री किंवा तुमच्या भावाने शब्द दिला म्हणजे दिला. या योजना बिलकुल बंद होणार नाही. आम्ही बहिणींना दीड हजारावर थांबवणार नाही तर तुम्हाला लखपती दिदी बनवणार आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लाडकी बहीणवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचं दिसत आहे. असं असतानाच लाडकी बहीण योजना मीच आणल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष दावा केला आहे. लाडक्या बहिणीची साथ देणारा हा एकनाथ आहे. यापुढे दरमहा तुम्हाला दीड हजार मिळणार आहेत. ही योजना कोणीही माईचा लाल बंद करू शकत नाही. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावाला जोडा मारा…. सोन्याचा चमचा, पौश्याच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळत नाही. माझी आई घर चालवताना कसं मन मारून घर चालवायची हे मी पाहिले आहे. म्हणून माझ्याकडे सूत्र आल्यावर मी माझ्या दोन्ही सहकाऱ्यांना सांगितले की आपण ही योजना सुरू करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT