श्रीमंतांना लाडू अन् गरिबाला बाहेर काढू! 'लालबागचा राजा' मंडळात का होतोय भेदभाव? उद्योगपतीनं शेअर केला VIDEO
Lalbaugcha Raja Crowd Viral Video: संपूर्ण देशभरात गणेश उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. मुंबईत सर्वात लोकप्रीय असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
लालबागचा राजा मंडळात सामान्य माणूस आणि व्हीआयपी यांच्यात भेदभाव का करतात?
प्रसिद्ध उद्योगपतीनं व्हिडीओ शेअर करत उपस्थित केले अनेक प्रश्न
Lalbaugcha Raja Crowd Viral Video: संपूर्ण देशभरात गणेश उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. मुंबईत सर्वात लोकप्रीय असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पहाटेपासून गणेशभक्त रांगेत उभे असतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून लालबागच्या मंडळात काही आलबेल नसल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे.
सामान्य माणूस तासनतास रांगेत उभा राहूनही बाप्पाचं दर्शन व्यवस्थित घेऊ शकत नाही, कारण व्हीआयपी म्हणजे सेलिब्रिटींसाठी मंडळाकडून दर्शनासाठी विशेष सोय करण्यात आलीय. दुसरीकडे सामान्य माणूस दर्शनासाठी असलेल्या रांगेत विनाकारण फटके सहन करतोय, यंदाही काही गणेशभक्तांना या भयानक परिस्थितीचा अनुभव आला. जवळपास 15 लाखांहून अधिक भाविक दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात.
हे ही वाचा >> Optical Illusion : फोटोत मुलांची गर्दी दिसतेय ना? पण घोडाही लपलाय, क्लिक करून बघा
परंतु, सामान्य भाविकांना गर्दीत नाहक त्रास सहन करावा लागतो. या मंडळात सुरु असलेल्या व्हिआयपी कल्चरबाबत प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयन्का यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गोयंका यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत या व्हीआयपी कल्चरविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हर्ष गोयंका यांनी लालबागचा राजाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. गोयंका यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय की, सामान्य भाविकांना लांब रांगेत उभं राहावं लागतं. पण यामध्ये भेदभाव होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
इथे पाहा व्हिडीओ
ADVERTISEMENT
भक्तीभावात सर्व समान आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, गेट थोडा उघडल्यानंतर गणेशभक्त दर्शनासाठी आत प्रवेश करतात. पण त्याचवेळी गेटजवळ असणारे लोक त्यांना ढकलून देतात. या धक्काबुक्कीत काही लोकांना इजाही झाल्याचं समोर आलंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सने हर्ष गोयंका यांच्या विचारांशी सहमत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की, म्हणून मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो नाही. दुसऱ्या यूजरने म्हटलं, सामान्य माणसाला दर्शन मिळणं कठीण असतं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: खूशखबर! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार तिसऱ्या हफ्त्याचे पैसे, फक्त...
ADVERTISEMENT