Cabinet Meeting: ‘लेक लाडकी योजना’ मंजूर, मुलींना नेमका कसा मिळणार फायदा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

lek ladki yojana approved in shinde fadnavis government cabinet meeting how exactly girls will get benefit
lek ladki yojana approved in shinde fadnavis government cabinet meeting how exactly girls will get benefit
social share
google news

Lek Ladki Yojana: मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) महत्त्वाकांक्षी अशा ‘लेक लाडकी योजने’ला (Lek Ladki Yojana) अखेर आज (10 ऑक्टोबर) मान्यता देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमडळांच्या बैठकीत आज एकूण सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये लेक लाडकी योजनेला मंजुरी देण्यात आली. तात्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेची घोषणा केली होती. ज्यानंतर आता या योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे. (lek ladki yojana approved in shinde fadnavis government cabinet meeting how exactly girls will get benefit)

या योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलींना मोठा फायदा होणार आहे. कारण या योजनेनुसार मुलींना तब्बल 1 लाख 1 हजार रुपये टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत. ज्यामुळे आता मुली देखील लखपती बनणार आहेत. लवकरच ही योजना कार्यान्वित होणार असून त्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार असल्याची माहिती समजते आहे.

जाणून घ्या लेक लाडकी योजना नेमकी कशी असणार

महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत असलेली लेक लाडकी ही योजना राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते.

कोणाला मिळणार फायदा?

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळेल. या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> पॉर्नस्टार मिया खिलाफाने ‘यांना’ दिला पाठिंबा, प्ले बॉयने दिली मोठी शिक्षा

कोणत्या साली जन्म झालेल्या मुलींसाठी ही योजना होणार लागू?

माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून 1 एप्रिल 2023 पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल.

ADVERTISEMENT

नेमका कसा मिळणार योजनेचा फायदा?

1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याच प्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

हे ही वाचा>> नांदेड रुग्णांच्या मृत्यूनंतर शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्र्यांकडून प्रचंड मोठी घोषणा

1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT