मविआचं गणित इथेही बिघडलं, महायुतीचं पारडं जड; बंडाचा बसला असाही फटका
नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रात ठाकरे सरकार आलं. त्याच्या वर्षभरात म्हणजेच २०२० मध्ये महाविकास आघाडीने १२ जणांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. 12 जागा या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रिक्त आहेत.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics : विधान परिषेदवर 12 आमदारांची राज्यपालांकडून केल्या जाणाऱ्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती अखेर उठली. त्यामुळे आता शिंदे सरकारचा 12 आमदारांची यादी पाठवण्याचा मार्ग मोकळा झालाय. पण, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होऊ शकतात? विधान परिषदेतलं बहुमत जे आधी महाविकास आघाडीकडे होतं, ते आताही कायम राहील की बदलत्या समिकरणांमुळे विधान परिषदेतल्या संख्याबळावरही परिणाम होईल? या निर्णयामुळे विधान परिषद सभापती निवडीचाही मुहूर्त लागेल का? विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही महायुतीचं बहुमत झालंय का, समजून घेऊयात.
नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रात ठाकरे सरकार आलं. त्याच्या वर्षभरात म्हणजेच २०२० मध्ये महाविकास आघाडीने १२ जणांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. पण, या यादीतील नावांवर काही आक्षेप असणं, किंवा त्यात कुणाची नावं वगळणं असणं, किंवा त्याला मंजुरी देणं, मंजुरी देण्याला विलंब का यावर मुख्यमंत्र्यांशी बोलणं, यातली कुठलीच गोष्ट तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केली नाही. प्रकरण हायकोर्टातही गेलेलं, पण कोर्टाने राज्यपालांबद्दल फक्त टिपण्णी केली की राज्यपालांनी याबाबत वेळीच निर्णय घ्यायला हवा, पण कुठलेही आदेश कोर्टाने राज्यपालांना दिले नाहीत.
12 आमदार नियुक्त्या, याचिका घेतली मागे
अखेर यासंदर्भातल्या याचिका सुप्रीम कोर्टात गेल्या. सप्टेंबर 2022 मध्ये कोर्टाने राज्यपालांमार्फत होणाऱ्या आमदारांच्या नियुक्त्यांनाच स्थगिती दिली. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीने ज्या 12 जणांची नावं राज्यपालांना पाठवलेली, ती नावं सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतली. त्यामुळे आता कोर्टाने स्थगिती उठवल्यावर शिंदे-फडणवीस सरकार नव्याने 12 जणांची नावं राज्यपालांकडे पाठवेल.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाचा >> अजित पवार एन्ट्री, शिंदे, फडणवीसांसह BJP च्या मंत्र्यांना बसणार मोठा फटका!
सध्याचं आपण विधान परिषदेतलं चित्र पाहिलं, तर 78 पैकी 21 जागा रिक्त आहेत. ज्यातील 9 जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या आमदारांच्या आहेत तर 12 जागा या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रिक्त आहेत.
आता विधान परिषदेत अगदी आताआता पर्यंत महाविकास आघाडीचं बहुमत होतं. पण आताही परिस्थिती तीच आहे की बदलली आहे, हे समजून घेण्यासाठी आकडेवारीवर नजर टाकूयात.
विधान परिषदेतील बलाबल, कुणाचे किती आमदार?
आता याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळात काही बदल झालेत. आधी शिंदेंच्या शिवसेनेकडे विधान परिषदेतून एकही आमदार नव्हता पण आता विप्लव बजोरिया, मनिषा कायंदे आणि निलम गोऱ्हे असे 3 आमदार आलेत, त्यामुळे मविआसोबत असलेल्या शिवसेनेकडे 8 आमदार राहिलेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बाबतीतही तसंच आहे. राष्ट्रवादीचे 9 पैकी 4 आमदार अजित पवार गटासोबत आहेत. त्यामुळे मविआसोबत असलेल्या राष्ट्रवादीकडे 5 आमदारच उरले आहेत.
ADVERTISEMENT
वाचा >> ’70 कोटींचं काय झालं’, उद्धव ठाकरे तापले! ‘कलंक’वरून मोदींवरही चढवला हल्ला
त्यामुळे मविआकडे काँग्रेसचे 8, पवारांसोबतचे 5 आणि ठाकरेंसोबतचे 8 असे 21 आमदार आहेत, तर महायुतीकडे भाजपचे 22 आमदार, शिंदेंच्या सेनेचे 3 आणि अजित पवार गटाचे 4 असे 29 इतके आमदार आहेत. त्यामुळे मविआ 21, तर महायुती 29 च्या संख्याबळाने बहुमताकडे गेली आहे.
ADVERTISEMENT
यापलिकडे इतर लहान पक्ष आणि अपक्षांचं गणित पाहायचं झालं तर…
रासपचे महादेव जानकर सोडले, तर सगळेच लहान पक्ष आणि अपक्ष मविआसोबत आहेत. नुकतेच फेब्रुवारी 2023 मध्ये विधान परिषदेवर निवडून गेलेले अपक्ष आमदार सत्यजित तांबेंची भूमिका काय हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. मग पुन्हा एकदा हे गणित पाहिलं तर मविआचे 21 + 5 = 26 होतात, तर महायुतीचे 29 + 1 = 30 असं संख्याबळ होतं.
वाचा >> ‘भाजप-शिवसेना युती तुटण्यामागे शरद पवारांची डील’; भुजबळांनी टाकला नवा ‘बॉम्ब’
त्यामुळे महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे, हे आता दिसतंय. यापलिकडे आता जर 12 जणांची यादी सरकारने पाठवली आणि राज्यपालांनी मंजूर केली तर मविआचे 21 + 5 = 26 इतकेच राहतील पण, महायुतीचे 29 + 1 + 12 = 42 असं संख्याबळ होईल. त्यामुळे विधानसभेत सुद्धा शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडे 200 च्या घरात आमदार, तिथेही बहुमत आणि विधान परिषदेतही बहुमत गाठणं भाजपला शक्य झालंय.
ADVERTISEMENT