Maharashtra: "लिंबू चमचाच्या शर्यतीत लिंबू पडल्यावर...",ठाकरेंची भाजपने उडवली खिल्ली
Maharashtra BJP Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल भाष्य केले. त्यावरून आता भाजपने ठाकरेंची खिल्ली उडवली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरेंवर भाजपची टीका
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदावरून लगावला टोला
ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाबद्दल केलेल्या विधानावर प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Maharashtra BJP: महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कुणीही असला, तरी आपला पाठिंबा राहील अशी भूमिका मांडली. ठाकरेंच्या या विधानावर बोट ठेवत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी डिवचले आहे. (Maharashtra BJP has criticized that Uddhav Thackeray has no other option but to support the chief ministerial candidate)
ADVERTISEMENT
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, "मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव जाहीर करा, उद्धव ठाकरेचा पाठिंबा असेल इती उध्दव ठाकरे… अहो, वोट जिहादच्या जीवावर निवडून आलेल्या तुमच्या उमेदवारांचा विजय, हा तुमचा खूप मोठा वैचारिक पराभव आहे."
महाराष्ट्राला काय मिळालं? भाजपचा ठाकरेंना सवाल
"जसं लिंबू चमचाच्या शर्यतीत लिंबू पडल्यावर पहिला येऊनही काही उपयोग नसतो, तसंच तुमचं झालं आहे. विचारधारा कधीच सोडली. आणि या बदल्यात तुम्हाला मिळालं काय? अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद. आणि महाराष्ट्राला मिळालं काय? अडीच वर्षांची विचारहीन, जुलमी, घोटाळेबाज आणि वसुलीबाज राजवट", अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.
हे वाचलं का?
हेही वाचा >> "आयएएस ऑफिसर म्हणताहेत, साहेब लवकर या", ठाकरे मेळाव्यात काय बोलले?
"आणि याबदल्यात तुम्ही गमावलं काय? विचारधारा तर आधीच गमावली होती, पण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचं पाणी करून उभा केलेला पक्ष तुम्ही अहंकारामुळे फोडला. बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारसदार, कार्यकर्ते तुमच्यापासून दुरावले"
"मुख्यमंत्री कुणीही झाला, तरी पाठिंबा देतो म्हणायची वेळ आलीये"
"आणि एवढं सगळं करूनही दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री पदासाठी लोटांगण घालूनही महाविकास आघाडीने न बोलता तुमचे मुख्यमंत्रीपद डावलले आहे. पण, तुमची अवस्था एवढी दयनीय झाली आहे की आज तुम्हाला मुख्यमंत्री कोणीही झाला तरी पाठिंबा देतो, असे म्हणायची वेळ आली आहे", असे म्हणत उपाध्ये यांनी ठाकरेंना डिवचले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT