महाराष्ट्र आता थांबणार नाही, मंत्रिमंडळ बैठकीत 10 धडाकेबाज निर्णय
Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मंत्रालयात बैठक पार पडली. त्या बैठकीत महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात आले आहेत, ते पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ
श्री क्षेत्र पंढरपुर येथील विशेष पुनर्वसन धोरणास सरकारकडून मंजुरी
वाचा धडाकेबाज निर्णय
Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मंत्रालयात बैठक पार पडली. त्या बैठकीत महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात आले आहेत. श्री क्षेत्र पंढरपुर येथील विशेष पुनर्वसन धोरणास सरकारने आता मंजुरी दिली आहे. यासह आज 18 ऑगस्ट रोजी इतर विविध विभागांच्या निर्णयांचा देखील समावेश घेण्यात आलाय. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्रिमंडळात अनेक सदस्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. अशातच जाणून घ्या एकूण मंत्रिमंडळातील इतर धडाकेबाज निर्णयांची संक्षिप्त स्वरुपात माहिती.
हे ही वाचा : LIVE: शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; आमदार अपात्रतेवरही खडाजंगी
क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी मिळालेली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखड्यातील 3 हजार 993 कोटी 90 लाख रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे, तर पंढरपुरचे धार्मिक, पारंपरिक महत्व, वारकरी भाविकांची संख्या, स्थानिक परिस्थिती व प्रकल्पाची तातडीची गरज विचारात घेऊन विशेष पुनर्वसन धोरण राबिवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार प्रकल्प बांधितासाठी विशेष पॅकेज देण्याच्या सुचनेला अनुसरून, जिल्हा प्रशासनाकडून नगर विकास विभागाने धोरण सादर केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग निर्णय
अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाने ट्रेडर्स प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर होणार असल्याची माहिती दिली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसह कंत्राटदारांची थकलेली देयके वेळेतच दिली जावी अशी सुलभता येणार आहे. असा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे.
गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा 2 च्या विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी देण्यात आलीये. क्रीडा संकुलनाला सुमारे 80 कोटी 12 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग सुलभ झाला असल्याचे क्रिडा विभागाचे धोरण आहे.
सोलापूर शहरातील जांबुमनी मोची समाज सेवा मंडळास जागा देण्यास मंजुरी. शहर सोलापूर उत्तर सदर बझार येथील शैक्षणिक कारणासाठी आरक्षित असलेली 3 हजार 910 चौ.मी. जागा सेवा मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमाला देण्यात येणार असल्याचा महसूल विभागाचा अंदाज आहे.
