Maharashtra Political Crisis: …तर एकनाथ शिंदेंना द्यावा लागेल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?
Supreme Court: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्ट जाहीर करणार असून त्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहणार की जाणार हे जवळजवळ स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Political News: मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा नेमका निकाल आज (11 मे) लागणार आहे. कारण मॅरेथॉन सुनावणीनंतर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय सुनावणार आहे. कोर्ट या प्रकरणी नेमका काय निकाल देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण निकालानंतर अनेक नवे राजकीय सवाल उपस्थित होऊ शकतात. या सगळ्याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात.
सुप्रीम कोर्टाचीही कसोटी पाहणारा खटला..
महाराष्ट्रच्या सत्तासंघर्षाच्या या खटल्यात घटनात्मक व्याख्या, संविधानाच्या अनुसूची 10 अंतर्गत पक्षांतर विरोधी कायदा, राज्यपालांचे अधिकार, सभापतींचे अधिकार, निवडणूक आयोगाची भूमिका आणि खुद्द सर्वोच्च न्यायालयाची भूमिका अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांचा समावेश आहे.
नबाम रेबिया 2016 च्या निकालावर “पुनर्विचार” करणे किंवा “स्पष्टीकरण” करणे आवश्यक आहे का? हा देखील न्यायालयासमोरील कळीचा मुद्दा होता. विधानसभा अध्यक्षाला हटवण्याची नोटीस भारताच्या राज्यघटनेच्या कलम 10 ला प्रतिबंधक म्हणून काम करेल का? अशा प्रश्नांची उत्तरं ही आजच्या निकालानंतर मिळणार आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ‘या’ प्रश्नांची मिळतील उत्तरे!
1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल का?, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पद बहाल करून यथास्थितीत सरकार आणलं जाईल का?
