देवेंद्र फडणवीसांवर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी संतापले, म्हणाले, ‘तुमचे हात…’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mahatma gandhi great grandson tushar gandhi file complaint against sambhaji bhide deccan police devendra fadnavis
mahatma gandhi great grandson tushar gandhi file complaint against sambhaji bhide deccan police devendra fadnavis
social share
google news

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही आणि संबंधितांवर योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले होते. यावर उपमुख्यमंत्र्यांचे (देवेंद्र फडणवीस ) हात कुणी बांधुन ठेवले आहेत, असा सवाल महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी नाव न घेता विचारला आहे.( mahatma gandhi great grandson tushar gandhi file complaint against sambhaji bhide deccan police)

आज सकाळी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी ट्विट करून संभाजी भिंडेंविरोधात तक्रार दाखल करण्याची माहिती दिली होती. त्यानुसार आज दुपारी 12 च्या दरम्यान तुषार गांधी यांनी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात संभाजी भिडेंविरोधात तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया अॅड असीम सरोदे पाहणार आहेत,अशी माहिती दिली.

हे ही वाचा : Amol Kolhe: ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’, अमोल कोल्हेंनी लोकसभा दणाणून सोडली!

भिडेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तुषार गांधी यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत गांधी म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले होते की,महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही, आम्ही योग्य कारवाई करू, कठोर पाऊलं उचलू, मग आता उपमुख्यमंत्र्यांचे (देवेंद्र फडणवीस ) याचे हात कुणी बांधुन ठेवले आहेत,असा सवाल तुषार गांधी यांनी केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संभाजी भिडे यांनी गांधी परीवारावर जी टीका केली आहे, त्यामुळे मला दुख झाले आहे. मला हा सर्व प्रकार कळताच मी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. संभाजी भिडे त्याच्या संस्था आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर ही तक्रार नोंदवली असल्याची माहिती तुषार गांधी यांनी दिली.

आतापर्यंत गांधींवरती टीका टिपण्णी व्हायच्या, पण या माणसाने बापूंच्या आईच्या व्यक्तीमत्वाविरोधात अपमान केला,त्यामुळे माझ्या परिवारातील आदरणीय मातेचा अपमान झाला असल्याचे तुषार गांधी म्हणाले. तसेच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचा त्यांनी अपमान केला. महाराष्ट्राची एक पुरोगामी छवी आहे, तिथे असा स्त्रियांचा अपमान झाला आणि तरी सुद्धा प्रशासन गप्प आहे, एक महिना जवळ जवळ होत आला असल्याचा संताप देखील तुषार गांधी यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Raj surve : आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाविरुद्ध म्युझिक कंपनीच्या सीईओचं अपहरण केल्याचा गुन्हा

दरम्यान या प्रकरणावर विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर उपमुख्यमंत्री कडक शब्दात म्हणाले की, आम्ही योग्य कारवाई करू,तपास करून कठोर पाऊल उचलू, त्यांचे हात आता कुणी बांधुन ठेवले आहेत, असा सवाल तुषार गांधी यांनी देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता केला आहे. तसेच आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, आणि त्या दृष्टीने आम्ही पाऊल उचलू,असे देखील तुषार गांधी म्हणाले.

ADVERTISEMENT

संभाजी भिडेंचे विधान काय?

शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना गरळ ओकली आहे. ‘महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास गांधी यांचे वडील नाहीत. त्यांचे खरे वडील हे एक मुस्लीम जमीनदार आहे, असे विधान संभाजी भिडे यांनी 27 जुलै रोजी अमरावतीत आयोजित एका कार्यक्रमात केला होता.

“महात्मा गांधींचे जे वडील म्हटले जातात, ते करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधींच्या आईला पळवून घरी आणले होते.”, असे संभाजी भिडे म्हणाले होते.

संभाजी भिडे इतक्यावरच थांबले नाहीत, तर पुढे म्हणाले, “महात्मा गांधी यांच्या आईला पळवून आणल्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे खरे वडील नाहीत, ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. महात्मा गांधींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. माझ्याकडे याबद्दल पुरावे देखील आहे”,असे विधान भिडे यांनी केले होते. भिडे यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT