Maharashtra Bandh: महाराष्ट्रात आज बंद आहे की नाही?
Maharashtra Bandh Latest News Update: बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली असून महाविकास आघाडीने आज २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या गंभीर प्रकरणामुळं राजकीय वातावरण तापल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कुरघोड्या सुरुच आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात बंदबाबत अनेकांना संभ्रम
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र बंदबाबत जाहीर केली भूमिका
उद्धव ठाकरे महाराष्ट्र बंदविषयी नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Bandh Latest News Update: बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली असून महाविकास आघाडीने आज २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या गंभीर प्रकरणामुळं राजकीय वातावरण तापल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कुरघोड्या सुरुच आहेत. मविआने महाराष्ट्र बंदची घोषणा केल्यानंतर या बंदविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने काल २३ ऑगस्टला अशाप्रकारचा बंद करण्यास मनाई केली. त्यामुळे महाराष्ट्रात बंद होणार की नाही? किती वाजेपर्यंत हा बंद सुरु राहील? असा संभ्रम लोकांना पडला होता.
ADVERTISEMENT
परंतु, कोर्टाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीने बंद मागे घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानेही बंद मागे घेण्याचं जाहीर केलं. परंतु, या बंदबाबत उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. (Due to the incident of sexual harassment in Badlapur, there has been a stir everywhere and the Maha Vikas Aghadi has today called for Maharashtra bandh on August 24. Due to this serious case, the political atmosphere has heated up)
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
"उद्या पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद हा विकृतीविरुद्ध होता. आताच थोड्या वेळापूर्वीच उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केली आहे. एका गोष्टीचं बरं वाटलं की, न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं. मी न्यायालयाकडून एकाच गोष्टीची अपेक्षा करतो की, ज्या तत्परतेने हा निर्णय दिलाय. तशीच तत्परता जे गुन्हे घडतायेत त्या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा देण्याची सुद्धा दाखवावी. उच्च न्यायलयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, परंतु कोर्टाचा आदर हा ठेवावा लागतो. या निर्णयाविरुद्ध आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. पण त्यात वेळ जाऊ शकतो. या बंदचं कारण हे वेगळं होतं."
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, आता अर्ज झटपट मंजूर होणार
ठाकरे पुढे म्हणाले, "आम्ही असं ठरवलं आहे की, ज्याप्रमाणे पवार साहेबांनी देखील आवाहन केलं आहे की, उद्याचा बंद मागे घ्यावा. तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेत आहोत. मात्र, राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून, काळे झेंडे घेऊन या सगळ्या गोष्टीचा निषेध करतील.बंदला तुम्ही नाही म्हणालात आम्ही तोंडच बंद ठेवतो. एकूणच या लोकशाही मानणाऱ्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे शिल्लक आहे की नाही. मोर्चे, संप यांना सुद्धा बंदी केलीए का? यावर घटनातज्ज्ञांनी मतं मांडली पाहिजे."
हे ही वाचा >> Exclusive: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, प्रचंड हादरवणारा रिपोर्ट मुंबई Tak च्या हाती
"जी गोष्ट बदलापूरमध्ये घडली ती अतिशय चिंतेची गोष्ट आहे. याविरोधात जर बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर आम्ही आमचं तोंडच बंद ठेवतो.आता ज्या काही घटना घडतायेत त्या घटनांची जबाबदारी कोण घेणार आहे? हे जे कोणी याचिकाकर्ते कोर्टात गेले आहेत त्यांच्यावर आता ही पुढची जबाबदारी राहील. घडणाऱ्या गुन्ह्यांची किंवा अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावर.. आणि उच्च न्यायालय याची जबाबदारी घेणार आहे का? हा सुद्धा प्रश्न आहे. माता-बहिणीच्या सुरक्षेसाठी सुरक्षित बहीण.. ही काही योजना नव्हे तर आजच्या काळाची गरज आहे. ती आंदोलनाच्या रुपाने आम्ही चालू ठेवू.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आता नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT