महाराष्ट्रात गुंडाराज! शिवसेना आमदाराच्या बॉडीगार्डची भररस्त्यात एकाला मारहाण', VIDEO व्हायरल
Mla Mahendra Thorve Bodyguard Viral Video: राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे एका व्यक्तीला मारहाण केली, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आमदार महेंद्र थोरवेंवर ठाकरे गटाने केला गंभीर आरोप
शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डचा व्हिडीओ व्हायरल
आमदार महेंद्र थोरवेंनी दिली माध्यमांना प्रतिक्रिया
Mla Mahendra Thorve Bodyguard Viral Video: राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे एका व्यक्तीला मारहाण केली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. बॉडीगार्डने भर रस्त्यात भर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ ठाकरे गटाने एक्सवर पोस्ट केला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एक्सवर पोस्ट करत म्हटलंय, महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही...कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये! कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय!.
हे ही वाचा >> Malaika Arora Father Suicide: अनिल अरोरा आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती, पाहा Video
इथे पाहा ठाकरे गटाने शेअर केलेला व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मारहाण करणारा तरुण माझा बॉडीगार्ड नाही, असा दावा थोरवे यांनी केला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! ऑनलाईन फॉर्मची प्रक्रिया बंद! आता 'असा' करावा लागेल अर्ज
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT