Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! ऑनलाईन फॉर्मची प्रक्रिया बंद! आता 'असा' करावा लागेल अर्ज
Mazi Ladki Bahin Yojana Latest update : महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात येत आहे. राज्याच्या विकासात महिलांचंही योगदान असावं, यासाठी महिलांना जास्तीत जास्त सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे, असा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आली समोर
लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्मची प्रक्रिया का बंद झाली?
आतापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ?
Mazi Ladki Bahin Yojana Latest update : महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात येत आहे. राज्याच्या विकासात महिलांचंही योगदान असावं, यासाठी महिलांना जास्तीत जास्त सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे, असा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. (The state government is making efforts to ensure that women contribute to the development of the state and hence women should benefit from maximum facilities after starting ladki bahin yojana)
ADVERTISEMENT
राज्य सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याची एकत्रीत रक्कम 3000 रुपये लाखो पात्र महिलांच्या खात्यावर जमा केले आहेत. याचदरम्यान महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने पत्नीच्या नावावर बनावट कागदपत्र बनवून 30 वेगवेगळे अर्ज भरले. यापैकी 26 अर्ज सरकारने मंजूर केल्याची माहिती समोर आली आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने या योजनेच्या ऑनलाईन अर्जाच्या प्रक्रियेला बंद केलं आहे. तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, तसच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? याची चिंता तुम्हाला असेल, तर आज आम्ही तुम्हाला याबाबतची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला सांगणार आहोत.
हे ही वाचा >> Viral Video: बाईईई!!! पुराच्या पाण्यात 1.5 किमीपर्यंत कार गेली वाहून, नवरा-बायको छतावर चढले अन्...
योजनेसाठी 'असा' करावा लागेल अर्ज
जर तुम्ही या योजनेसाठी अद्यापही अर्ज केला नसेल, तर तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन कर्मचाऱ्यांना भेटावं लागेल. त्यांच्याकडून अर्जाचा फॉर्म दिला जाईल. नाहीतर तुम्ही कोणत्याही ऑनलाईन केंद्रात जाऊन हा फॉर्म घेऊ शकता. नाहीतर या https://majhiladkibahin.in/mazi-ladki-bahin-yojana-online-form/ लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म डाऊनलोड करू शकता. या फॉर्मला प्रिंट करून व्यवस्थित आणि अचूकपणे भरायचा आहे. त्याचसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून तो फॉर्म अंगणवाडी केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडे जमा करावा. याप्रकारे तुम्ही सहजरित्या अर्ज करू शकता.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Satara Crime: पोलिसांचा एक सापळा अन् 14 गुन्ह्यांची उकल! लाखो रुपयांच्या दागिन्यांसह चोरट्यांना कसं पकडलं?
योजनेची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया बंद
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संबंधीत एक मोठा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला या योजनेसाठी कुणीही घरबसल्या अर्ज करू शकले असते किंवा सेतू केंद्रात जाऊन अर्ज करू शकले असते. पण या योजनेच्या माध्यमातून घोटाळा होत असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT