Satara Crime: पोलिसांचा एक सापळा अन् 14 गुन्ह्यांची उकल! लाखो रुपयांच्या दागिन्यांसह चोरट्यांना कसं पकडलं?
Satara Crime Update : कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला. विक्रम कित्तूरकर आणि त्याच्या साथीदारानं, घरफोडीचा गुन्हा केल्याचं स्पष्ट झालं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'असा' झाला चोरट्यांचा पर्दाफाश
चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कसा रचला सापळा?
चोरट्यांना पकडताच 'त्या' 14 गुन्ह्यांची झाली उकल
Satara Crime Update : कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला. विक्रम कित्तूरकर आणि त्याच्या साथीदारानं, घरफोडीचा गुन्हा केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर संशयित विक्रम कित्तूरकरचा माग काढण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं. १९ ऑगस्ट रोजी बेळगावमधला विक्रम कित्तुरकर हा चोरटा, चोरीचे दागिने विकण्यासाठी मुरगुड नाका ते सिद्धनेर्ली रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचून चोरीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या दोघा चोरट्यांना अटक केली. या चोरांकडून १ किलो २०० ग्रॅम सोनं आणि दीड किलो चांदीचे ८६ लाखांचे दागिने हस्तगत केले. दुसरा चोरटा महादेव धामणीकरला कर्नाटक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. (There were incidents of theft by armed robbers in Kodoli police station. Or after the incident the police started investigating the case)
ADVERTISEMENT
घरफोडीच्या आणि चोरीच्या घटनांचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी सूत्र फिरवली होती. कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्रम कित्तूरकर आणि त्याच्या साथीदारानं, घरफोडीचा गुन्हा केल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर संशयित विक्रम कित्तूरकरचा माग काढण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं. १९ ऑगस्ट रोजी बेळगावमधला विक्रम कित्तुरकर हा चोरटा, चोरीचे दागिने विकण्यासाठी मुरगुड नाका ते सिद्धनेर्ली रस्त्यावर येणार असल्याची माहिती, पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली.
हे ही वाचा >> Numerlogy Horoscope : 'या' मुलांकाची लोकं नशीबवान! आज 11 सप्टेंबरचा दिवस कसा असेल?
चोरीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सापळा रचून अटक केली. आरोपीकडून १ किलो २०० ग्रॅम सोनं आणि दीड किलो चांदीचे ८६ लाखांचे दागिने हस्तगत केले. मुरगुड नाका ते सिद्धनेर्ली रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी विक्रम उर्फ राजू कित्तुरकरला अटक केली. त्याच्याकडून १ किलो २०० ग्रॅम सोनं आणि दीड किलो चांदी आणि दुचाकी असा ८६ लाखाचा ऐवज हस्तगत केला. तर त्याचा आणखी एक साथीदार महादेव धामणीकरला कर्नाटक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज पत्रकार परिषद घेवून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या कामगिरीचं कौतुक केलं.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Rabbit Optical Illusion: फोटोत ससा दिसतोय? पण तो ससा नाही, एकदा क्लिक करून बघा
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं चौकशी करून, खानापूर इथल्या फेडरल बँकेत तारण ठेवलेले २३३ ग्रॅम सोन्याचे दागिने ताब्यात घेण्यात आले. तर या दोघा चोरटयांकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. या दोघा चोरटयांकडून कोल्हापूरसह, परजिल्ह्यातील १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक चेतन मसूटगे, सागर वाघ, उपनिरीक्षक संदीप जाधव, जालिंदर जाधव, शेष मोरे, हवालदार हिंदुराव केसरी, सुरेश पाटील, समीर कांबळे, दीपक घोरपडे, संजय पडवळ, विलास किरुळकर, सचिन पाटील यांनी केली, अशी माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT