Viral Video: बाईईई!!! पुराच्या पाण्यात 1.5 किमीपर्यंत कार गेली वाहून, नवरा-बायको छतावर चढले अन्...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Gujrat Flood Couple Viral Video
Gujrat Flood Couple Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्यानंतर काय घडलं?

point

पुराच्या पाण्यात कारमध्ये अडकलेल्या दाम्पत्याचा जीव वाचला का?

point

पुराच्या पाण्यात दीड किमीपर्यंत कार गेली वाहून, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Couple Socking Viral Video : गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. साबरकांठा जिल्ह्यात एक व्यक्ती आणि त्याची पत्नी कारसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. पाण्यात कार बुडत असतानाच दाम्पत्य कारच्या छतावर चढले. पण त्यानंतर असं काही घडलं जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

ADVERTISEMENT

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्यानंतर एक दाम्पत्य कारच्या छतावर चढले. तो व्यक्ती मोबाईलने कॉल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर ती महिला बुडालेल्या कारवर शांत बसली आहे. पूराच्या पाण्यात अडकलेल्या कारचा फक्त छताचा भागच दिसत आहे. काही वेळानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शर्थीचे प्रयत्न करून या कपलचा जीव वाचवला. (Heavy rains have wreaked havoc in Gujarat for the last few days. In Sabarkantha district, a man and his wife went into Purachya water with their car. The car drowned in the water and the couple climbed the roof of the car)

इथे पाहा पुरात अडकलेल्या दाम्पत्याचा व्हायरल व्हिडीओ

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : 'या' मुलांकाची लोकं नशीबवान! आज 11 सप्टेंबरचा दिवस कसा असेल?

रिपोर्टनुसार, करोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने या दाम्पत्याची कार 1.5 किमीपर्यंत वाहत गेली. अग्निशमन दलाचे अधिकारी कमल पटेल म्हणाले की, एक बोटीसह एक सुरक्षा दल त्याच ठिकाणी प्रवास करत होता. त्यामुळे आम्ही त्यांना सुरक्षीतपणे बाहेर काढू शकलो. व्हिडीओ शेअर करत एका एक्स यूजरने म्हटलं की, "ते खूप शांत आहेत. गुजरातच्या साबरकांठामधून एक सुरक्षा अभियान".

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Maharashtra Weather: ढगाळ वातावरण, मुसळधार सरी; महाराष्ट्राला आज हायअलर्ट! 

हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजनरे प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'ते एव्हढे बेसावध कसे राहू शकतात'!!!, दुसऱ्या यूजरने म्हटलं, 'शांतीला सलाम'. पुरात अडकलेल्या सुरेश मेस्त्री यांनी म्हटलं, जेव्हा आम्ही नदी ओलांडत होतो, तेव्हा पुराच्या पाण्याची पातळी वाढली. त्यानंतर पाण्याचा प्रवाह इतक वेगवान झाला की, आमची कार जवळपास 1.5 किमीपर्यंत वाहत गेली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT