Malaika Arora Father Suicide: अनिल अरोरा आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती, पाहा Video

मुंबई तक

ADVERTISEMENT

Police Statement On Anil Arora Suicide Case
Police Statement On Anil Arora Suicide Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनिल अरोरा आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

point

मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांची मोठी प्रतिक्रिया

point

अनिल अरोरा यांच्या आत्महत्येचं कारण काय?

Malaika Arora Father Died : अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांच्या आत्महत्येमुळं संपूर्ण बॉलिवूड हादरून गेला आहे. बुधवारी अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं. या दुर्देवी घटनेमुळं अरोरा कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्येचं टोकांच पाऊल का उचललं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच याप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. (The entire Bollywood is in shock due to the suicide of actress Malaika Arora's father Anil Arora)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिली खळबळजनक माहिती

मलायका अरोरा यांचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनामुळं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनिल यांनी आत्महत्या केली, त्यावेळी मलायका पुण्यात होती. वडिलांच्या निधनाबाबत कळताच मलायका तातडीनं मुंबईत रवाना झाली. सोशल मीडियावर मलायकाचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. वडिलांच्या निधनाचा मलायकाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! ऑनलाईन फॉर्मची प्रक्रिया बंद! आता 'असा' करावा लागेल अर्ज

पोलिसांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, अनिल अरोरा यांचा मृतदेह मिळाला आहे. ते सहाव्या मजल्यावर  होते. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. आम्ही कसून तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीमही आली आहे. अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 
मलायका अरोराच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार तिच्या घरी पोहोचले आहेत. अरबाज खाननेही अरोरा कुटुंबीयांची भेट घेतली. तसच अभिनेता अर्जून कपूर आणि इतर सेलिब्रिटींनी अरोरा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Satara Crime: पोलिसांचा एक सापळा अन् 14 गुन्ह्यांची उकल! लाखो रुपयांच्या दागिन्यांसह चोरट्यांना कसं पकडलं?

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला आहे. आता पोलिसांच्या तपासात कोणती माहिती उघड होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येची बातमी समोर येताच मलायकाचा पहिला पती अरबाज खान सर्वात आधी मलायकाच्या घरी पोहोचला. ज्या ठिकाणी तिच्या वडीलांनी आत्महत्या केलीय. अरबाजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT