शहाजीबापू पाटलांचा फिटनेस फंडा; साठीत केला डाएट फॉलो…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सांगोला : काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या डायलॉगमुळे देशभरात फेमस झालेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता चर्चेत येण्याच कारण त्यांचा डायलॉग नाही तर लुक आहे. आमदार शहाजी पाटील यांनी तब्बल ८ दिवसांत ९ किलो वजन कमी केलं आहे. त्यामुळे ते आता एका नव्या रुपात दिसणार आहेत.

ADVERTISEMENT

शहाजीबापू यांच्या या कामगिरीची महाराष्ट्रभर चर्चा होऊ लागली आहे. एवढ्या कमी दिवसांमध्ये त्यांच्या या थक्क करणाऱ्या वेटलॉसमागील नेमकं गमकं काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. तर तब्बल १२५ किलो वजन असलेल्या आमदार पाटील यांनी बंगळुरु येथील श्री. श्री. रविशंकर यांच्या आश्रमात राहून पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करून आपलं ९ किलो वजन कमी केले आहे.

हिवाळी अधिवेशनात शहाजी पाटील केवळ दोन दिवस सहभागी झाले हाेते. त्यानंतर आमदार पाटील हे मित्र महेश पाटील यांच्या सोबत थेट कर्नाटकामधील श्री श्री कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स अँड रिसर्च हॉस्पिटल या ठिकाणी पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले. अखेरीस आता त्यांची ही उपचार पद्धती संपली असून ते सोमवारी सायंकाळी आपल्या चीक महूद गावात येणार आहेत. तसंच उद्यापासून पुन्हा ते सांगोला येथील कार्यालयात मतदारांशी संवाद साधण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.

हे वाचलं का?

शहाजी पाटील यांनी काय केले उपचार?

बंगळुरूमधील आश्रमात शहाजी पाटील यांचा दिनक्रम २४ डिसेंबरपासून सुरु झाला होता. आठ दिवस ते पहाटे पाच वाजता उठून दोन तास योगासन करत होते, तसंच उकडलेल्या पालेभाज्या आणि शाकाहारी सात्विक आहार घेणे असा त्यांचा दिनक्रम हाेता. याशिवाय रोज संध्याकाळी मेडिटेशनचाही भाग होता. याच ध्यान, धारणा आणि व्यायाम यामुळे त्यांचं ८ दिवसांमध्ये ९ किलो वजन कमी झालं आहे. शनिवारी त्यांचा हा वेटलाॅस कोर्स पूर्ण झाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT