हद्दच झाली! आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाचा ट्रॅक्टर गेला चोरीला
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या सुपुत्राचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडलीय. संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत यांच्या मालकीचा पाच लाख रूपये किमतीचा हा ट्रॅक्टर होता.
ADVERTISEMENT
MLA Sanjay Shirsat’s son’s tractor was stolen : छत्रपती संभाजी नगर : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या सुपुत्राचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडलीय. संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत यांच्या मालकीचा पाच लाख रूपये किमतीचा हा ट्रॅक्टर होता. या प्रकरणी आता सातारा पोलीस (Satara Police) ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे.(mls sanjay shirsat son sidhhant sirsat tractor was stolen from near house)
ADVERTISEMENT
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट हे माजी नगरसेवक राहिले आहेत. सिद्धांत शिरसाट यांनी व्यवसायासाठी 5 लाख रूपये किमतीचा ट्रॅक्टर खरेदी केला होता. हा ट्रॅक्टर त्यांनी सातारा परिसरातील तंत्रज्ञनगर येथे उभा करून ठेवला होता. मात्र अज्ञातांनी हा ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना आता घडली आहे.
हे ही वाचा : “आ गए गद्दार”, शरद पवार शिंदेंवर बरसले, मोदींवरही चढवला हल्ला!
या प्रकरणी आता शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार सातारा पोलीस (Satara Police)ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा आला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस आता आरोपींचा शोध सुरु आहेत. पोलिसा खबरींच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करतायत.
हे वाचलं का?
अजित पवारांबाबत काय म्हणाले होते?
अजित पवार बंडाच्या तयारीत असताना संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती. ‘अजितदादांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करू. अनेक पक्षात असं होतं… आमच्याबाबत देखील आमचा तोच अनुभव आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला का सोडलं? आम्ही आघाडी का सोडली? कारण आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही. तिकडचा असणारा नेता तो ज्या काही पद्धतीने कारभार करतो. आज अजितदादांना मोकळीक नाही असं माझं मत आहे. त्यामुळे जर त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करू. नाहीतर आम्ही सत्तेमध्ये राहणार नाही. राष्ट्रवादी सोडल्यानंतर अजित पवार भाजपमध्ये गेले तर त्यांचं स्वागत आहे. आमच्याकडे आले तरी स्वागत आहे.’
हे ही वाचा : पत्रकार परिषद शरद पवारांची, पण चर्चा सोनिया दुहानांची, त्या कोण आहेत?
‘आमची शिवसेना-भाजपची विचारधारा त्यांना मान्य असेल तर आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत राहू. राष्ट्रवादी हा शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि त्याचे हे सर्व सदस्य आहेत. म्हणून आता त्या पक्षातील अस्वस्थता आता बाहेर पडू लागली आहे. त्याचा परिणाम १-२ दिवसात दिसून येईल. राजकारणात निर्णय घ्यायला धाडस लागतं. त्यासाठी वेळेची वाट पाहावी लागत नाही.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT