Sanjay Raut : ‘बॅनरवर हुतात्म्यांचे फोटो नाहीत, ठगांचे फोटो’, राऊतांचा सरकारवर निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sanjay raut cabinet meeting sambhajinagar
Sanjay raut cabinet meeting sambhajinagar
social share
google news

Sanjay Raut : राज्य मंत्रिमंडळाची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक होत आहे. त्या बैठकीवर खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी शहीद झालेल्या जवानांना सरकारकडून अभिवादन करण्यात आले नसल्याने सरकारवर त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधला आहे. ज्या सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे, त्यांना विसरण्याचे पाप आम्ही करणार नाही. मात्र या सरकारकडून आजच्या बैठकीत शहीद जवानांचा (Martyr soldiers) त्यांना विसर पडल्याने त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. संभाजीनगरमध्ये (sambhajinagar) बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, बॅनरवर हुतात्म्यांचे फोटो नाहीत, तर ठगांचे फोटो असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

दुष्काळ असताना वारेमाफ खर्च

मराठवाड्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळाच्या संकटात आहे. पावणे आठशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही शिंदे-फडणवीस-पवार सरकारने वारेमाफ खर्च करत आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवाचे निमित्त साधत या सरकारकडून वारेमाफ खर्च केला जात आहे. मात्र शेतकरी आत्महत्या करत असतानाही आणि त्यांना कोणतीही मदत न देता पंचतारांकित हॉटेलवरच खर्च करत सरकारकडून वारेमाफ खर्च केला जात आहे.

हे ही वाचा >> फसवणुकीचा अमृतकाल! ‘सामना’तून शिंदे सरकारचे वाभाडे

सरकारी तिजोरीवर बोजा

खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून सरकारवर टीका करत आहेत. त्यावरून सरकारमधील मंत्र्यांनीही इंडियाच्या बैठकीवर काही सवाल उपस्थित केले आहेत. इंडियाच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचाही खर्च कोण करते असा सवाल उपस्थित केला आहे. त्यावर राऊतांनी सांगितले की, इंडियाच्या बैठकीचा खर्च आम्ही पक्षातून केला आहे. प्रत्येक पक्षाने तो वाटून घेतला आहे. त्यामुळे असा सवाल उपस्थित करणाऱ्यांना सरकारी तिजोरीचे काही पडले नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> IAS टीना डाबी बनल्या आई, जयपूरमध्ये दिला बाळाला जन्म

शेंड्या लावण्याचा सनातन प्रकार

देवेंद्र फडणवीस 2016 मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाड्यासाठी मोठ मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी 50 हजार कोटीचे पॅकेजही जाहीर केले होते. त्याचवेळी त्यांनी ट्रान्सफर हबचीही घोषणा केली होती. मात्र त्यानंतर इतक्या वर्षात त्यांना जमीन मिळाली नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे दिलेल्या घोषणांची परिपूर्ती आधी करा, लोकांना शेंड्या लावण्याचा सनातर प्रकार थांबवा असा जोरदार टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT