चित्रा वाघ सप्रिया सुळेंवर चांगल्याच भडकल्या! ‘मोठ्या ताई’ म्हणत दिलं प्रत्युत्तर
राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या घटनेला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत असल्याची टीका केली होती. या टीकेला आता भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics News : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये (Mumbai local) एका 20 वर्षीय तरूणीवर महिलांच्याच डब्यात शिरून एका 40 वर्षीय व्यक्तीने लैगिक अत्याचार केल्याची दुदैवी घटना घडली होती. या घटनेतील आरोपीला 8 तासानंतर पोलिसांनी अटक केली आहे.राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या घटनेला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत असल्याची टीका केली होती. या टीकेला आता भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी उत्तर दिले आहे. (mumbai local train rape incident bjp chitra wagh reply ncp supriya sule)
ADVERTISEMENT
लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना अतिशय संतापजनक आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलमध्येम महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) केली आहे. तसेच या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
हे ही वाचा : मुंबई पुन्हा हादरली! 20 वर्षीय तरुणीवर धावत्या लोकल ट्रेनमध्ये बलात्कार
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या देवेंद्र फडणवीसांवरील टीकेला आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उत्तर दिले आहे. लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठ्ठं स्टेटमेंट करण्याआधी मोठ्ठ्या ताईंनी थोडी शहानिशा करायला हवी होती. तुम्ही मुलीवर लोकल ट्रेनमध्ये बलात्कार झाल्याचं ट्विट केलंय पण तसं काहीच घडले नसल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. आरोपीने मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता आणि पोलिसांनी लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली, ही वस्तुस्थिती असल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या.
हे वाचलं का?
रेल्वे पोलीस दलाकडून तुम्ही माहिती घेऊ शकला असता,पण ते न करता बलात्कार झाला म्हणत ट्वीट केले आहात. अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, काविळ झालेल्यांना जग जसं पिवळं दिसतं तसं तुमचं झालंय, अशी टीका चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर केली.तसेच सत्तेचा स्ट्राईक रेट कमी झाल्याचा हा परिणाम आहे, असे देखील चित्रा वाघ म्हणाल्या आहेत .तुमच्या या वक्तव्यामुळे खोट्या बातम्यांचा आणि अफवांचा सुकाळ होण्यास हातभार लागतोय. त्यामुळे नाहक मुलीची बदनामी करू नका. अफवा पसरवू नका, असे आवाहन देखील चित्रा वाघ यांनी केले.
हे ही वाचा : ‘एका जाहिरातीने…’, एकनाथ शिंदेंसमोर देवेंद्र फडणवीस ‘त्या’ जाहिरातीवर काय बोलले?
नेमकी घटना काय?
मीडिया रिपोर्टनुसार मुंबईच्या गिरगावची रहिवासी असलेली पिडीत तरूणी परीक्षेसाठी नवी मुंबईच्या बेलापुरच्या दिशेने जात होती. यासाठी तिने लोकल पकडली होती. या लोकलमधील महिलांच्य़ा डब्ब्यात ती एकटीच चढली होती. आरपीएफ देखील या डब्ब्यात नव्हते. याचाच फायदा घेत, आरोपीने महिलांच्या डब्यात प्रवेश करून तरूणीसोबत लैगिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या या कृत्याला तिने विरोध करत आरडाओरड देखील केली. यानंतर पुढच्याच स्टेशनवर आरोपीने पळ काढला. या घटनेनंतर पीडित तरूणी ट्रेनमधून उतरून पुरूषांच्या डब्यात शिरली होती.
ADVERTISEMENT
तरूणी घाबरलेल्या अवस्थेत पाहून पुरूष प्रवाशांनी तिची विचारपूस केली. यावेळी तरूणीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानंतर पुरूष प्रवाशांनी पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आठ तासात आरोपीला अटक केली होती. आरोपीवर बलात्काराच्या आरोपासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT