Chawadi: ‘साहेबांशी माझे संबंध कसे हे कळायला अजित पवारांना…’, प्रफुल पटेल असं का म्हणाले?
मुंबई Tak च्या चावडीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांचे शरद पवारांशी कसे संबंध आहेत याबाबत त्यांनी भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Tak Chawadi: मुंबई: ‘माझे आणि शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचे संबंध किती गाढ आहे हे अजून अजित पवारांना (Ajit Pawar) कळायला देखील खूप वर्ष लागतील.’ असं भुवया उंचवणारं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी मुंबई Tak च्या चावडीवर बोलताना केलं आहे. प्रफुल पटेल हे शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जातात. अशावेळी प्रफुल पटेलांनी चावडीवर बोलताना जे विधान केलं त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. (mumbai tak chawadi ncp working president praful patel sharad pawar ajit pawar supriya sule politicians in maharashtra)
ADVERTISEMENT
पाहा चावडीवर प्रफुल पटेल नेमकं काय म्हणाले?
‘अजित पवार आणि माझे चांगले संबंध असणं काही चुकीचं आहे? माझे आणि शरद पवार साहेबांचे संबंध किती गाढ आहे हे अजून अजित पवारांना कळायला देखील खूप वर्ष लागतील. माझं एक वैशिष्ठ आहे की, माझे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. इतर पक्षांमध्येही चांगले संबंध आहेत.’
हे ही वाचा >> Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यात थेट घुसले, मुंबई पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या!
‘राजकारण हा काही माझा धंदा नाही. ती माझी आवड आहे. लोकांची सेवा करायची म्हणून मी राजकारणात आहे. माझी स्टाइल एक वेगळी आहे. मला इतरांचं सारखं पटत नाही. इतर पक्षातील लोकांसोबत माझी मैत्री आहे. म्हणून माझ्या पक्षातील सर्वांसोबत.. म्हणजे मी कुठल्या गटातला वैगरे नाही. म्हणून तर शरद पवार साहेबांनी माझ्यासारख्या एवढे वर्ष विश्वास दाखवला, जबाबदाऱ्या दिल्या.’ असं प्रफुल पटेल यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
ताई की दादा… प्रफुल पटेल कोणाला निवडणार?
‘मी कोणाच्याही इमेज बिल्डिंगसाठी बसलेलो नाही. जे मला वाटतं ते मी सांगणार. अजित पवार हे काही नवे राजकारणी नाही. एक आहे की, प्रत्येकाची स्टाइल वेगळी असते. राजकारण वेगळं असतं.’
हे ही वाचा >> शरद पवारांचं केसी राव यांच्या भारत राष्ट्र समितीबद्दल मोठं विधान; म्हणाले…
‘मी माझ्या पक्षात जबाबदार व्यक्ती आहे. मला जोपर्यंत असं वाटतं की, काम करण्याची संधी आहे तर मी त्याबाबत काम का करणार नाही.. आता तुम्ही म्हणालात की, अजितदादा की, ताई… मी आता जर तरबाबत बोलणार नाही. सुप्रिया सुळे, अजित पवार असो.. किंवा बाकी कोणी असो… जे काही प्रमुख मंडळी आहेत. त्यांना सगळ्यांच्या सोबत काम करावं एकमेकांनी ही महत्त्वाची बाब आहे. पुढे नंतर काय होईल.. कोणाला कोणाची पसंती राहिल हे सगळं म्हणजे माझ्या मते हे नंतर आहे.’ असं अत्यंत सावध उत्तर यावेळी प्रफुल पटेल यांनी दिलं आहे.
ADVERTISEMENT
‘उत्ताराधिकारी निवडण्याचा प्लॅन काय क्लिअर आहे.. मी पण आहे ना कार्याध्यक्ष.. म्हणजे असं कसं… म्हणजे मी काय फिलर आहे का?’, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT