‘जनतेपेक्षा त्यांना हायकमांड…’, सुप्रिया सुळेंच्या देवेंद्र फडणवीसांना कानपिचक्या
नागपूरमध्ये पूरस्थिती असतानाही आणि तेथील नागगरिकांना वाऱ्यावर सोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले होते.त्यावरुनच खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
Supriya Sule : नागपूरसह परिसरात शनिवारी झालेल्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. कालच्या पावसात नागपूरमधील अंबाझरी तलाव परिसरात चार तासात 100 मिलि मीटर पाऊस झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो (Ambazari Lake overflow) होऊन तलावाचे पाणी 10 हजारपेक्षा जास्त घरातून शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीवरूनच आता राजकारण तापले आहे. एकीकडे नागपूरमध्ये पूरस्थिती सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे असूनसुद्धा देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnavis) मात्र राजकीय व्यस्त होते. या परिस्थितीही लोकांना वाऱ्यावर सोडणे चुकीचे असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya sule) यांनी ट्विटद्वारे (tweet) केली आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेमुळे आता हे राजकारण तापणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. (nagpur heavy rain flood situation mp supriya sule criticized deputy chief minister devendra fadnavis tweeting)
ADVERTISEMENT
नागपूर शहर परिसरात पूरस्थिती
नागपूरमध्ये 100 मिलिमीटरपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे अंबाझरी तलावाचे पाणी परिसरातील घरामधून शिरले. त्यामुळे प्रचंड नुकसान येथील नागरिकांचे झाले आहे. नागपूरमध्ये पूरस्थितीमध्ये असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र जनतेला वाऱ्यावर सोडून ते राजकीय कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे त्यांना जनतेपेक्षा हायकमांडच महत्वाचे वाटत असल्याचा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
नागपूर शहर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे शहरात अक्षरशः पूरस्थिती आहे. काही नागरीक बुडाल्याचे देखील समोर आले असून अनेकांचे संसार वाहून गेले. हि स्थिती अतिशय गंभीर आहे. शहरातील सांडपाणी आणि मलनिःसारण व्यवस्थेच्या सर्व मर्यादा यामुळे समोर आल्या आहेत. नागपूर महापालिकेने यावर केलेल्या…
— Supriya Sule (@supriya_sule) September 24, 2023
हे वाचलं का?
अनेकांचे संसार वाहून गेले
नागपूरमध्ये आलेल्या पुराचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मात्र त्याच वेळी त्यांनी इंडिया आघाडीतील सर्व सदस्यांना त्यांनी मदत करण्याचेही आवाहन केले आहे. कारण या पुरामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. त्यांना मदतीची अपेक्षा असून त्यांना आपल्याकडून मदत द्यावी असे आवाहनाचे ट्विट त्यांनी केले आहे.
हे ही वाचा >> Nagpur Rain : ‘ हे दुःख सहन करण्यापलिकडचे’, पूरस्थिती बघून फडणवीस म्हणाले…
नागपूर मनपाच्या कामावर बोट
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्टिटमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कामावरही बोट ठेवले आहे. शहरातील सांडपाणी आणि मलनिःसारण व्यवस्थेच्या सर्व मर्यादा यामुळे समोर आल्या आहेत. नागपूर महापालिकेने यावर केलेल्या कामाचा दर्जा काय आणि कसा आहे हे देखील यामुळे स्पष्ट झाले आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT
फडणवीस राजकीय कार्यक्रमात व्यस्त
नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे. तरीही देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षाच्या राजकीय कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कामावर बोट ठेवल्याने फडणवीस यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> मुंबईकडे येत असतानाच प्रसूतीकळा; रेल्वे स्थानकात दिला गोंडस बाळाला जन्म
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT