Navneet Rana : सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारला धक्का, नवनीत राणांना 'सर्वोच्च' दिलासा!
Navneet Rana Caste Certificate : नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा

महाराष्ट्र सरकारला मोठा झटका

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल केला रद्द
Navneet Rana caste certificate Supreme Court Verdict : (संजय शर्मा, दिल्ली) मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत सुप्रीम कोर्टाने खासदार नवनीत राणा यांना मोठा दिलासा. त्यामुळे त्यांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Supreme court sets aside Bombay High court verdict cancelling navneet rana's caste certificate)
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रांचा वापर केल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते. उच्च न्यायालयाचे निरीक्षणही सुप्रीम कोर्टाने रद्द केले. महाराष्ट्र सरकारने नवनीत राणांना जात प्रमाणपत्र देण्यास विरोध केला होता.
न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. संबंधित कागदपत्रे नवनीत राणा यांच्याकडून सादर करण्यात आल्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवलेलं आहे. समितीच्या निष्कर्षांमध्ये उच्च न्यायालयाकडून केलेला हस्तक्षेप योग्य नव्हता, असे न्यायालयाने नमूद केले.
नवनीत राणांनी दिलं होतं आव्हान
मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. या निकालाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर निकाल देताना न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.