नवनीत राणा उद्धव ठाकरेंना म्हणाल्या बेडूक,अमरावतीत कार्यकर्त्यांचा राडा
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून विदर्भ दौऱ्यावर होते. ठाकरेंच्या या दौऱ्यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पावसाळ्यात बेडूक बाहेर पडल्याची टीका केली होती. या टीकेनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे बॅनर फाडले होते.
ADVERTISEMENT
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून विदर्भ दौऱ्यावर होते. ठाकरेंच्या या दौऱ्यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पावसाळ्यात बेडूक बाहेर पडल्याची टीका केली होती. या टीकेनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे बॅनर फाडले होते. यानंतर राणा दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचे बॅनर फाडले होते. या फाडाफाडीच्या राजकारणामुळे आता अमरावतीत (Amravati) तणावपूर्ण वातावरण असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (navneet rana ravi rana criticized udhhav thackeray on two days vidarbha tour maharashtra politics)
ADVERTISEMENT
विदर्भ दौऱ्यात आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पोहोरादेवीचे दर्शन घेतले होते. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ट्वीट करून टीका केली होती.अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना विदर्भातील लोकांना तोंड दाखवले नव्हते. आणि आता पाऊस सुरु झाला आणि बेडूक बाहेर पडले, अशी टीका नवनीत राणा यांनी ठाकरेंवर केली.
अडीच वर्ष महाराष्ट्र चे मुख्यमंत्री असताना विदर्भात लोकांना तोंड दाखवला नाही, पाऊस सुरू झाला का?? “मेंडक🐸” बाहेर पडले.
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) July 9, 2023
हे वाचलं का?
आमदार रवी राणा यांनी देखील ठाकरेंवर निषाणा साधला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विदर्भात तोंड दाखवलं नाही. कोरोना काळात कधी मंत्रालयात गेले नाही.आणि आज विदर्भात पावसाळी बेडका सारखं येऊन मताची भिक मागत आहे,अशी टीका रवी राणा यांनी केली होती.
राणा दाम्पत्यांच्या या टीकेनंतर ठाकरेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. आणि या आक्रमक शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा कार्यक्रमाचे बॅनर फाडले होते. राणा दाम्पत्याचा येत्या सोमवारी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे बॅनर सर्वदुर लागले होते. हे बॅनर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी फाडून टाकत त्याठिकाणी हनुमान चालिसा पठण केली. यासोबत राणा दाम्पत्यामध्ये हिंमत असले तर त्यांनी उद्या सकाळी येऊन हनुमान चालिसाचे पठण करून दाखवावे, शिवसैनिक त्यांना आपल्या शब्दात उत्तर देईल, असे आव्हान दिले होते.दरम्यान राणा दाम्पत्याचे हे बॅनर फाडल्यानतर आता राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंचे बॅनर फाडले आहेत. त्यामुळे आता अमरावतीत राजकारण चांगलेच तापले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT