Lok Sabha Election 2024 : खर्गे-पवारांचं बिनसलं अन् भाजपसोबत सत्तास्थापणेची बोलणी; अजित पवारांचा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar big revealation on sharad pawar mallikarjun kharge nehru center meeting 2019 election
2019 ला कोणत्याच पक्षाला बहुमत न आल्याने राष्ट्रवादीने भाजप आणि काँग्रेस-शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचे पर्याय खुले ठेवले होते.
social share
google news

Ajit Pawar Big Revealation : वसंत मोरे, पुणे : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. असाच गौप्यस्फोट आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी दौडच्या सभेत केला. 2019 ला कोणत्याच पक्षाला बहुमत न आल्याने राष्ट्रवादीने भाजप आणि काँग्रेस-शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचे पर्याय खुले ठेवले होते. एकदा मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवारांची चर्चा सूरू असताना खर्गे पवारांना काहीतरी बोलले आणि चिडचिड झाली.त्यानंतर शरद पवार (Sharad pawar) बैठकीतून उठले आणि त्यांनी आपलं ठरलंय तस (भाजपसोबत जाण्याचं) करून टाका, असा आदेश नेत्यांना दिला, असा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. (ajit pawar big revealation on sharad pawar mallikarjun kharge nehru center meeting 2019 election)  

ADVERTISEMENT

''देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती...त्यांच्या बंगल्यावर मीटिंगा व्हायच्या, कुणाच्या बापाला कळायच्या नाही. आम्ही विमानाने उतरलो की आपलं आपलं तिकडे जायचो, मीटींग व्हायची. एका मीटींगनंतर मुंबईला आल्यावर अमित शाह मला म्हणाले, मागचा अनुभव आम्हाला काय चांगला आला नाही, तु शब्दाचा पक्का आहे.तुझ्या देखत हे ठरलेले आहे. यामध्ये असचं करायचं, मी म्हटलं ठरलं तर करायचं, दिलेला शब्द पाळायचा'', असे अजित पवारांनी अमित शाहांना सांगितले. 

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर जोरदार हल्ला

''मग त्यांनी सांगितल आता राष्ट्रपती राजवट आणा. आम्ही म्हटलं ही राष्ट्रपती राजवट कशाला? तर लोकांना असा मेसेज गेला पाहिजे की पुन्हा निवडणूका होईल. मग आपण भाजपसोबत जायचं. मग हे राहिलं बाजूलाच आणि आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा करायला लागलो. त्यावेळी मी विचारलं हे मागच काय झालं. ते म्हणाले दोन्ही मार्ग आपल्याला खुले ठेवायचे. इकडे का इकडे नंतर ठरवू'', असे अजित पवारांनी सांगितले. 

हे वाचलं का?

''नेहरू सेंटरला चर्चा व्हायची. एकदा काय झालं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे शरद पवारांना काहीतरी बोलले आणि चिडचिड झाली. शरद पवार उठले आणि तिथून वरच्या मजल्यावर खाली चालले. प्रफुल पटेल आणि मला बोलावलं, हे काही म्हणतील तसं ऐकत नाही. विधानसभा अध्यक्षांवरून मतभेद झाले आणि काहीतरी जागांवरून मतभेद झाले. ते म्हणाले की, यांना काही सरकार करायचं नाही. आपलं ठरलंय तसं करून टाका. बरं म्हटलं करून टाकतो. शरद पवार निघून गेले.प्रफुल पटेल यांना म्हटलं आता काय करायचं? ते म्हणाले काय करायचं ते करा'', असा खुलासा अजित पवारांनी केला. 

हे ही वाचा : भाजपने का दिलं तिकीट? अखेर उज्ज्वल निकमांनीच दिलं उत्तर

''जयंत पाटील यांना बोललो ते म्हणाले, दादा तुम्ही वर्षावर जा. पण दाराची फट उघडी ठेवा. कोण? करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील. मी म्हटलं, साहेब आपण प्रातांध्यक्ष. जशी आज्ञा. चर्चेला गेलो. रात्रीची वेळ.त्यांना तिकडून दिल्लीला फोन केला. त्यांनी सांगितलं की, उद्या सकाळी तुमची मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो. आपण त्या पद्धतीने गोष्टी केला. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी रात्री दीड वाजता कॅबिनेट बैठक झाली. सकाळी 8 वाजता शपथविधी झाला. त्यावेळी पुन्हा काय राजकारणा झालं ते सर्वांना माहिती आहे'',असा दावा देखील अजित पवारांनी केला. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT